Home /News /technology /

Make in India: भारतात Appleने सुरु केलं iPhone 11चं उत्पादन, चीनला धक्का

Make in India: भारतात Appleने सुरु केलं iPhone 11चं उत्पादन, चीनला धक्का

Appleची प्रमुख पुरवठादार कंपनी असलेल्या Foxconn ने आपल्या भारतातल्या प्लाँटच्या विस्तारासाठी 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

    नवी दिल्ली 24 जुलै: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिल्यानंतर केंद्र सरकार कामाला लागलं आहे. जगातली सगळ्यात मोठी टेक कंपनी असलेल्या Apple Inc कंपनीने आपला सगळ्यात लोकप्रिय ब्रँड असलेल्या iPhone 11चं उत्पादन भारतात सुरु केलं आहे. चेन्नईच्या Foxconnच्या प्लांटमध्ये हे उत्पादन सुरु झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी दिली आहे. Apple पहिल्यांदाचा आपल्या मोठ्या ब्रँड्ची निर्मिती भारतात करत आहे. (iPhone Manufacturing in India) या आधी Appleने 2019 मध्ये iPhone XR ची जोडणी भारतात सुरू केली होती. तर 2017 Appleने iPhone SE 2016चं उत्पादन बंगळुरूमध्ये सुरु केलं होतं. iPhone SE 2020चं उत्पादनही बंगळुरुतल्या Wistron इथं करण्याची कंपनीची योजना आहे. Appleची प्रमुख पुरवठादार कंपनी असलेल्या Foxconn ने आपल्या भारतातल्या प्लाँटच्या विस्तारासाठी 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. तसेच दुसरी मोठी पुरवठादार कंपनी असलेल्या Pegatronनेही भारतात गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. 12 GB RAM आणि 5G! One Plus चा बजेटमधला फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स अनेक मोठ्या कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. कोरोनाच्या उद्रेकानंतर चीनबद्दल अनेक कंपन्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांनी आता फक्त चीनवरच अवलंबून न राहाता भारतासारखी मोठी बाजारपेठ असलेल्या भारतावर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे हा चीनला धक्का मानला जात आहे. आयफोन 11 तीन प्रकारांत उपलब्ध आहे. आधीच्या सीरिजप्रमाणेच स्टोरेजच्या हिशोबाने हे प्रकार आहेत आणि अधिक मेमरी स्टोरेज असल्याने फोन महाग आहे. 64GB, 128GB आणि 256GB या तीन व्हेरिअंटमध्ये आयफोन11 उपलब्ध आहे. या सगळ्या फोनला 12 मेगापिक्सेल सेन्सर कॅमेरा आहे. WhatsApp देणार ही नवी सुविधा! वेगवेगळ्या फोनमध्ये वापरता येणार एकच नंबर iPhone Pro आणि iPhone Pro Max या फोनला 12-megapixel sensors सह वेगवेगळ्या फोकल लेन्सही आहेत. iPhone 11 ला मात्र फक्त 12-megapixel sensors सह रेग्युलर लेन्स असेल आणि टेलिफोटो लेन्स सर्व फोनमध्ये उपलब्ध आहेत. जगभरातल्या लोकांच्या पंसतीस हा फोन उतरला आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या