नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) 1 जानेवारी 2021 पासून थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडरद्वारे संचालित यूपीआय पेमेंट (UPI payment) सेवेवर 30 टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम लागू झाल्यानंतर गूगल पे, अॅमेझॉन पे, फोन पे यासारख्या थर्ड पार्टी अॅपच्या ग्राहकांवर परिणाम होईल. परंतु, या नियमाचा पेटीएम ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.
थर्ड पार्टी अॅप्सची मक्तेदारी रोखण्यासाठी एनपीसीआयनी उचलली पावलं -
एनपीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सवर 30 टक्के कॅप लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात कोणत्याही थर्ड पार्टी अॅप्सची मक्तेदारी रोखण्यासाठी आणि त्यांना विशेष लाभ मिळू नये म्हणून एनपीसीआयने हा निर्णय घेतला आहे. एनपीसीआयच्या या निर्णयामुळे कोणत्याही पेमेंट अॅपची यूपीआय व्यवहारांमध्ये मक्तेदारी राहणार नाही.
30% कॅप निश्चित केल्यामुळे आता गुगल पे, अॅमेझॉन पे, फोन पे यासारख्या कंपन्यांना यूपीआय अंतर्गत केवळ जास्तीत जास्त 30 टक्के ट्रान्झेक्शन करता येतील.
पेटीएमवर का परिणाम होणार नाही -
एनपीसीआयच्या या निर्णयामुळे पेटीएमच्या यूपीआय पेमेंट सेवांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. 30% कॅप पेटीएमवर लागू होत नाही. कारण पेटीएमकडे पेमेंट्स बँकेचं लायसन्स आहे. त्यामुळे पेटीएमची सेवा थर्ड पार्टी अॅप्सच्या श्रेणीमध्ये येत नाही.
यूपीआय (UPI) म्हणजे काय?
युनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय ही रिअल टाइम ऑनालाइन पेमेंट सिस्टम आहे. जी मोबाइल प्लॅटफॉर्मद्वारे त्वरित बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकते. यूपीआयच्या माध्यमातून आपण अनेक यूपीआय अॅप्सवर बँक खात्याला लिंक करू शकता. त्याच वेळी, अनेक बँक खाती यूपीआय अॅपद्वारे ऑपरेट केली जाऊ शकतात.
भारतात नोटबंदी लागू झाल्यानंतर 2016 पासून डिजिटल पेमेंटना प्राधान्य देण्यात आलं. जेणेकरून रोख रक्कम बाळगणं कमी व्हावं आणि ऑनलाइन व्यवहारांची सुरक्षितताही नागरिकांना मिळावी. त्याचवेळी पेटीएमने ऑनलाइन पेमेंट अॅप आणि नंतर यूपीआय सेवा उपलब्ध झाली.
भारत सरकारनेही 30 डिसेंबर 2016 ला भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM) हे अप सुरू केलं होतं. एनपीसीआयनेच भीम अॅप विकसित केलं असून त्याद्वारे आता लाखो आर्थिक व्यवहार अगदी सहजपणे होतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.