जुनी गाडी देऊन अशी मिळवा नवी कार; जाणून घ्या काय आहे ऑफर

जुनी गाडी देऊन अशी मिळवा नवी कार; जाणून घ्या काय आहे ऑफर

देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असलेल्या महिंद्रा आणि महिंद्रा (Mahindra and Mahindra) कंपनीनं एक अभिनव योजना दाखल केली आहे. यामध्ये ज्या लोकांना आधीची जुनी कार विकून नवी कार घ्यायची आहे त्यांना कंपनी चांगली संधी देत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 एप्रिल : 15 वर्षे जुनी वाहनं आता रस्त्यावर उतरवण्यास बंदी असल्याचं अलीकडेच रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार आता 15 वर्षे किंवा त्यापेक्षा जुनी वाहने रस्त्यावर चालवण्यास बंदी असून अशी वाहने स्क्रॅप केली जात आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे अशा जुन्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असलेल्या महिंद्रा आणि महिंद्रा (Mahindra and Mahindra) कंपनीनं एक अभिनव योजना दाखल केली आहे. यामध्ये ज्या लोकांना आधीची जुनी कार विकून नवी कार घ्यायची आहे त्यांना कंपनी चांगली संधी देत आहे.

सध्या देशभरात कोरोना साथीची दुसरी लाट (Corona Second Wave) पसरल्यामुळे ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करून कंपनीनं ग्राहकांना सर्व सेवा घरबसल्या पुरवली आहे. त्यामुळे कंपनीचे लोक घरी येऊन तुमच्या जुन्या कारचे मूल्यांकन (Valuation) करतील. कंपनीचे लोकच गाडी घरातून घेऊन जातील. त्यानंतर एक प्रमाणपत्र दिलं जाईल, त्याआधारे नवीन कार घेताना रोड टॅक्सवर सूट मिळेल.

कंपनीने यासाठी एमएमआरपीएल (MMRPL) या रिसायक्लिंग (Recycling) क्षेत्रातील कंपनीशी करार केला आहे. एमएमआरपीएल ही जुन्या वाहनांच्या रिसायक्लिंग क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. याच कंपनीनं देशातील पहिला ऑटोमोटिव्ह अँड स्टील रिसायक्लिंग प्रकल्प उभारला आहे. जानेवारी 2018 पासून कंपनीनं सेरो (CERO) ब्रँडनेम अंतर्गत काम सुरू केलं आहे. महिंद्रानं या कंपनीशी केलेल्या करारामुळे ग्राहकांना आपली जुनी गाडी स्क्रॅप (Scrap) करून महिंद्राची नवी गाडी खरेदी करण्याची सुविधा मिळाली आहे.

(वाचा - ड्रायव्हिंग टेस्टवेळी या चुकीमुळे 31 टक्के लोक होतात फेल, या गोष्टीकडे द्या लक्ष)

महिंद्रा आणि महिंद्राचे ऑटोमोटिव्ह विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राम नाकरा म्हणाले, 'एमएमआरपीएल कंपनीशी करार करून आम्ही ग्राहकांना अधिक चांगली सुविधा देऊ इच्छितो. जे ग्राहक आपली जुनी गाडी स्क्रॅप करू इच्छितात त्यांचं काम एकाच ठिकाणी होणार आहे. ग्राहकांच्या कारची स्क्रॅपची किंमत आणि एक्स्चेंज किंमत ठरवली जाईल. ग्राहकांची कार स्क्रॅप झाल्यानंतर CERO कडून डीस्ट्रक्शन प्रमाणपत्रही दिले जाईल. यामुळे नवीन कार सवलतीच्या किमतीत मिळू शकेल'.

सध्याच्या काळात कंपनीनं दिलेली ही सुविधा ग्राहकांसाठी अत्यंत उपयुक्त असून, घरबसल्या त्यांना आपली जुनी कार स्क्रॅप करून महिंद्राची नवी कार घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

First published: April 11, 2021, 10:55 PM IST

ताज्या बातम्या