नवी दिल्ली, 10 मार्च : तुम्ही नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. महिंद्रा अँड महिंद्राने
(Mahindra and Mahindra) मार्चमध्ये आपल्या SUV रेंजमध्ये निवडक मॉडेलवर मोठ्या डिस्काउंटची घोषणा केली आहे. मॉडेल आणि वेरिएंडच्या आधारे काही निवडक रेंजवर 3 लाखांपर्यंतची सूट मिळते आहे. ही ऑफर मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत वॅलिड आहे.
Mahindra and Mahindra सध्या XUV300, Scorpio, KUV100 NXT, Bolero, Bolero Neo, Marazzo आणि Alturas G4 SUVs वर डिस्काउंट देत आहे.
Alturas G4 वर 3 लाखांपर्यंतची सूट -
सर्वाधिक सूट टोयोटा फॉर्च्यूनरशी टक्कर असलेली महिंद्राची Alturas G4 SUV वर मिळते आहे. या कारवर 3 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट आहे. यात 2.20 लाख कॅश डिस्काउंट आहे. त्याशिवाय 50000 रुपये एक्सचेंज बोनस, 11500 रुपये कॉर्पोरेट सूट आणि 20000 रुपये मोफत अॅक्सेसरिज सामिल आहेत.
KUV100 -
महिंद्राची सर्वात स्वस्त कार Mahindra KUV100 NXT SUV वर 38,055 रुपयांच्या सूटशिवाय 20000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपये कॉर्पोरेट सूट मिळते आहे. Mahindra XUV300 SUV वर 30000 रुपये कॅश डिस्काउंट दिला जात आहे. त्याशिवाय मोफत अॅक्सेसरिज असून त्याची किंमत 10000 रुपयांपर्यंत आहे. त्याशिवाय 25000 रुपये अतिरिक्त एक्सचेंज बोनस आणि 4000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट आहे.
Scorpio -
या कारवर 34000 रुपयांची सूट आहे. यात 15000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 4000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट सामिल आहे. Mahindra Bolero आणि Bolero Neo चांगल्या डिस्काउंटसह आहेत. जुन्या बोलेरोवर 24000 रुपयांपर्यंत सूट आहे. Bolero Neo मॉडेल 24000 रुपयांच्या डिस्काउंटमध्ये खरेदी करता येईल. Mahindra Marazzo वर 40,200 ची सूट मिळते आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.