Home /News /technology /

वारंवार लाईट जातेय? फक्त 300 च्या EMI वर घरी घेऊन या Smart Inverter, सोलारचाही आहे पर्याय

वारंवार लाईट जातेय? फक्त 300 च्या EMI वर घरी घेऊन या Smart Inverter, सोलारचाही आहे पर्याय

तुमच्याकडेही वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असेल तर तुमच्यासाठी Inverter हा चांगला पर्याय आहे. केवळ 300 रुपयांच्या हप्त्याने तुम्ही हा बजेट Inverter घेऊ शकता.

    मुंबई, 13 एप्रिल : एप्रिलचा कडक उन्हाळा सुरू झालेला असतानाच राज्यावर विज संकट कोसळलं आहे. आजकाल ज्या प्रकारे घरांमध्ये स्मार्ट उपकरणांचा वापर वाढला आहे, वारंवार वीज खंडित होण्यामुळे तुमची समस्या वाढू शकते. तुम्ही टीव्ही-लॅपटॉप किंवा पंखे आणि कुलर चालवू शकणार नाही. अनेकजण वर्क फ्रॉम होम करत असल्याने त्याच्यासाठी ही मोठी अडचण आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी इन्व्हर्टरची (home inverter) मोठी मदत होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला काही बजेट इन्व्हर्टरची माहिती सांगणार आहे. आजकाल बाजारात लेटेस्ट फीचर असलेले इन्व्हर्टर आले आहेत, जे तुम्ही केवळ अॅपद्वारे कनेक्ट आणि मॉनिटर करू शकता. तर काही इन्व्हर्टरमध्ये सोलर सपोर्टची सुविधा देखील आहे. या उन्हाळ्यात तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकणार्‍या बाजारातील काही सर्वोत्कृष्ट इन्व्हर्टर UPS बद्दल जाणून घेऊ या. V-Guard Smart Pro 1200 Digital Sinewave UPS वी-गार्डचा स्मार्ट प्रो 1200 (V-Guard Smart Pro 1200) UPS अनेक नवीन वैशिष्ट्यांसह येतो. त्याची आउटपुट पॉवर 1000 W आहे, चार्जिंग करंट 15 Amperes आहे, बॅटरीची कमाल क्षमता 200 AH आहे. हे 1000W इतक्या हेवी लोड वर चालू शकते. एवढेच नाही तर टर्बो चार्ज फास्ट चार्जिंगची सुविधा देते. यात विविध परिस्थितींसाठी अनेक परफॉर्मन्स मोड आहेत. हे इन्व्हर्टर UPS इलेक्ट्रिक इस्त्री, कॉफी मेकर आणि अगदी हेवी उपकरणांना उर्जा देऊ शकते. हे केवळ शक्तिशाली आणि कार्यक्षम नाही तर ते खूप सोयीस्कर देखील आहे. इन्व्हर्टर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. आपल्याला अॅपद्वारे त्याच्याशी संवाद साधता येतो. तुम्ही अॅपद्वारे अनेक अॅडवान्स सेटिंग्ज बदलू शकता. उदाहरणार्थ तुम्ही पॉवर नियंत्रित करू शकता, बॅकअप वेळ तपासू शकता, वेगवेगळ्या मोडमधून स्विच करू शकता. तुम्ही काही काळासाठी बाहेर जात असताना तुम्ही हॉलिडे मोड वापरू शकता. यामुळे कमी वीज वापरासह इन्व्हर्टर चालू राहील. Amazon वर या उत्पादनाची किंमत 7,998 रुपये आहे. तुम्ही ते रु. 376 च्या मासिक EMI वर खरेदी करू शकता. Free WI-FI ला मोबाईल कनेक्ट करायचाय? मग ही Trick वापरून बघाच Genus Surja Pro 1150 40AMP 12 V Premium Solar Inverter UPS तुम्हाला सोलरला सपोर्ट करणारे इन्व्हर्टर हवे असल्यास, जीनस सुरजा प्रो 1150 हा पर्याय असू शकतो. अगदी नवीन सोलर मॅक्सिमायझर आहे. इतर कोणत्याही इन्व्हर्टर UPS मध्ये तुमच्या सोलर पॅनलमधून सर्वोत्तम उर्जा निर्मितीसाठी लेटेस्ट फीचर नाहीत. शिवाय या श्रेणीतील इतर कोणतेही इन्व्हर्टर पूर्णपणे सोलरवर चालू शकत नाही आणि तुम्हाला व्यावहारिकदृष्ट्या शून्य वीज बिल देऊ शकत नाही. हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना सौर पीव्ही पॅनेलमधून जास्तीत जास्त सौर उर्जेचा वापर करण्यास आणि ग्रिड पॉवरवरील अवलंबित्व कमी करण्यास अनुमती देते. यामुळे विजेचे बिल तर कमी होईलच पण पर्यावरणाचे रक्षण होण्यासही मदत होईल. यामध्ये स्मार्ट एनर्जी सेव्हर मोड येतो. तुम्ही UPS मोड आणि वाइड व्होल्टेज सामान्य मोडमध्ये सहजपणे स्विच करू शकता. हे सोलर + ग्रिड किंवा ओन्ली सोलर किंवा ओन्ली ग्रिडवर काम करते. इतकेच नाही तर ते 110V AC पेक्षा कमी इनपुट व्होल्टेजवरही बॅटरी चार्जिंगची सुविधा देते. Amazon वर या इन्व्हर्टरची किंमत 6,975 रुपये आहे. तुम्ही ते 328 रुपयांच्या मासिक EMI वर देखील खरेदी करू शकता. कंपनी यावर 24 महिन्यांची वॉरंटी देत ​​आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Electricity, Electricity bill

    पुढील बातम्या