मुंबई, 5 ऑक्टोबर : इनफिनिक्सने भारतात आपला नवा स्मार्टफोन Infinix Hot 10 लॉन्च केला आहे. विशेष बाब म्हणजे प्रीमियम फीचर्स असूनही याची किंमत 10 हजाराहूनही कमी ठेवण्यात आली आहे. हा फोन फ्लिपकार्ट Flipkart एक्सक्लूसिव्ह असून, मेड इन इंडिया made in indiaफोन आहे. या फोनची किंमत 9999 रुपये असून याचा पहिला सेल 16 ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आला आहे.
काय आहेत Infinix Hot 10 चे स्पेसिफेकशन्स
Infinix Hot 10 मध्ये 6.78 इंची HD+ पिन होल डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनला 6GB+128GB स्टोरेज आहे. ग्राहक हा फोन Ocean Wave, Moonlight Jade, Obsidian Black आणि Amber Red रंगात खरेदी करु शकतात.
हे वाचा -फ्रीमध्ये लहान मुलांचे आधार कार्ड? थोडक्यात जाणून घ्या प्रक्रिया
हा फोन MediaTek Helio G70 सह येतो. त्याशिवाय यात HyprEngine Game टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. फोन DTS ऑडियो प्रोसेसिंगसह आहे. तसंच XOS 7.0 एंड्रॉयड 10 वर काम करतो.
हे वाचा -उच्चांकी पातळीवरुन 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं; जाणून घ्या दिवाळीपर्यंत काय अ
फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यात 16 मेगापिक्सल AI कॅमेरा आहे. सोबत Quad LED फ्लॅश, मॅक्रो लेन्स आणि डेप्थ लेन्सही आहे. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल इन डिस्प्ले कॅमेरा आहे, जो वाईड सेल्फी मोडसह देण्यात आला आहे. यात AI HDRही आहे. फोनचा कॅमेरा सुपर नाईट मोडसह येतो.
The Hot Saga continues with much-awaited launch of the-all-new #InfinixHot10. Do more with 6+128GB and step up your game with the fast G70 processor at a mind-boggling price of just ₹9,999.
Infinix Hot 10ला 5200mAhची बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगसह येते. या फोनची बॅटरी 23 तास व्हिडिओ प्लेबॅक, 41 तास म्युझिक प्लेबॅक, 19 तास गेमिंग टाईम आणि 66 दिवस स्टँडबाय टाईमसह असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
Published by:Karishma Bhurke
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.