Home /News /technology /

अखेर ठरलं! भारतात या दिवशी लाँच होणार मेड इन इंडिया FAU-G; पाहा गेमचा जबरदस्त Trailer

अखेर ठरलं! भारतात या दिवशी लाँच होणार मेड इन इंडिया FAU-G; पाहा गेमचा जबरदस्त Trailer

लाँचिंगनंतर अँड्रॉईड युजर्स प्ले स्टोअरवर गेम डाउनलोड करू शकतात. मात्र अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरसाठी FAU-G कधी सुरू होईल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

  नवी दिल्ली, 4 जानेवारी : 'मेड इन इंडिया' गेम FAU-G अखेर लाँच होणार आहे. nCORE Games ने FAU-G च्या तारखेचा खुलासा केला आहे. गेमच्या तारखेसह FAU-G चा ट्रेलरही लाँच करण्यात आला आहे. मागील 4 महिन्यांपूर्वी FAU-G गेमची घोषणा करण्यात आली होती. गेमचं प्री-रजिस्ट्रेशन नोव्हेंबर महिन्यात सुरू झालं होतं. प्री-रजिस्ट्रेशन सुरू झाल्याच्या 24 तासांच्या आतच जवळपास 10 लाख लोकांनी गेमसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. अखेर आता या गेमची लाँचिंग डेट ठरवण्यात आली आहे. बहुप्रतिक्षित FAU-G Game भारतात 26 जानेवारी रोजी लाँच केला जाणार आहे. लाँचिंगनंतर अँड्रॉईड युजर्स प्ले स्टोअरवर गेम डाउनलोड करू शकतात. मात्र अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरसाठी FAU-G कधी सुरू होईल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

  (वाचा - कोरोना वॅक्सिनसाठी CoWIN अ‍ॅपवर रजिस्टर करावं लागेल; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस)

  गेमचा ट्रेलर जबरदस्त असून यात 14,000 फूट उंचीवर, 34.7378 डिग्री नॉर्थ, 78.7780 डिग्री ईस्ट आणि मायनस 30 डिग्री तापमानात लडाखमध्ये LAC जवळ भारतीय सैनिक आपलं शौर्य दाखवताना दिसतात. ट्रेलरमध्ये गलवान घाटीची झलक दिसेल, ज्यात युजर्स स्क्वॉडचा भाग बनून शत्रूला प्रत्यूत्तर देतील. गेल्या वर्षात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही गेमचा एक अधिकृत सिनेमॅटिक टीजर ट्विट केला होता. दरम्यान, FAU-G गेम भारतीय गेम डेव्हलपर कंपनी nCore Games ने तयार केला आहे. FAU-G गेम, पबजीला रिप्लेस करेल आणि पबजी ज्याप्रमाणे लोकप्रिय होता, तसाच हादेखील लोकल आणि ग्लोबल स्तरावर लोकप्रिय होईल, असा विश्वास nCore Games चे संस्थापक आणि प्रमुख विशाल गोंडल यांनी व्यक्त केला आहे. FAU-G गेम आत्मनिर्भर भारतचा भाग असल्याचं विशाल गोंडल यांनी सांगितलं.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: PUBG, Pubg game

  पुढील बातम्या