एक लाख रुपयांचा पंखा, महागड्या फॅनमध्ये आहेत खास फीचर्स

एक लाख रुपयांचा पंखा, महागड्या फॅनमध्ये आहेत खास फीचर्स

लक्झरीयस फॅन तयार करणाऱ्या कंपनीने एक लाख 25 हजार रुपये किंंमतीचा खास फीचर्स असलेला स्मार्ट फॅन लाँच केला आहे.

  • Share this:

स्मार्टफोनमध्ये सातत्याने येत असलेल्या नवनव्या तंत्रज्ञानामुळे इतर उपकरणातही बदल होत आहेत. स्मार्टफोनच्या मदतीने घरातील उपकरणं कंट्रोल करता येतात. तशी सुविधा फोन आणि उपकरणात केलेली असते. एसी, टीव्ही, फ्रीज, ओव्हन यासारखी उपकरणे स्मार्टफोनवरून चालू बंद करता येतात. आता एक स्मार्ट फॅनसुद्धा लवकरच बाजारात येणार आहे.

लक्झरी फॅन निर्मिती करणारी कंपनी Luxaire पहिला स्मार्टफॅन लाँच केला आहे. याचे फॅनचे नाव Lux 5130 असं ठेवण्यात आलं आहे. या फॅनची किंमत जास्त असल्याचे कारण याची खास फीचर्स आहेत.

कंपनीने स्मार्टफॅनची किंमत 1 लाख 25 हजार रुपये इतकी ठेवली आहे. या फॅनच्या मोटरला 10 वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की, आतापर्यंत ही सर्वाधिक वॉरंटी आहे.

Lux 5130 फॅन Luxaire च्या बेंगळुरू, हैदराबाद च्या शोरूमसह वेबसाइटवरही उपलब्ध आहे. वुडन ब्लेड डिझाइन, ग्लॉस आणि प्रीमियम फिनिशचा हा फॅन 4 पाती असलेला आहे. यामध्ये व्हाइट मोटरसह मॅट व्हाइट ब्लेड, ब्लॅक मोटरसह वॉलनट कलर ब्लेडमध्ये उपलब्ध आहे.

इतका महाग असलेल्या या फॅनला WiZ वरून कंट्रोल करता येतं. यातून फॅनचे स्पीड आणि मोड मॅनेज करता येतात. याला व्हाइस कमांड देता येते. स्मार्ट फॅन अॅलेक्सा, गूगल असिस्टंट आणि सिरी सिस्टीम सपोर्ट करतो. रिमोटने टीव्ही कंट्रोल करतात त्याप्रमाणे फॅन कंट्रोल करता येतो.

फक्त 6 सेकंदात पकडते 100 किमी वेग, अशी आहे Audi Q8 ची किंमत आणि फीचर्स

First published: January 19, 2020, 10:18 PM IST
Tags: fan

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading