मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /LPG Gas Cylinder: केवळ 9 रुपयांत गॅस सिलेंडर बुक करण्याची शेवटची संधी, असं करा पेमेंट

LPG Gas Cylinder: केवळ 9 रुपयांत गॅस सिलेंडर बुक करण्याची शेवटची संधी, असं करा पेमेंट

809 रुपयांचा सिलेंडर केवळ 9 रुपयांत बुक करता येऊ शकतो. एका सिलेंडर बुकिंगमागे 800 रुपये सेव्ह करू शकता. 30 एप्रिलपर्यंतच या ऑफरचा फायदा घेता येऊ शकतो. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी केवळ एक दिवस बाकी आहे.

नवी दिल्ली, 29 एप्रिल : जर तुम्ही गॅस सिलेंडर बुकिंग (LPG gas cylinder) करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. 809 रुपयांचा सिलेंडर केवळ 9 रुपयांत बुक करता येऊ शकतो. एका सिलेंडर बुकिंगमागे 800 रुपये सेव्ह करू शकता. पेटीएमकडून (Paytm) ग्राहकांसाठी ही खास ऑफर देण्यात आली आहे. 30 एप्रिलपर्यंतच या ऑफरचा फायदा घेता येऊ शकतो. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी केवळ एक दिवस बाकी आहे.

किती मिळेल कॅशबॅक -

ज्यावेळी गॅस बुकिंगसाठी पेमेंट कराल, त्यावेळी तुम्हाला 800 रुपयांचं स्क्रॅच कार्ड मिळेल. यात 10 रुपयांपासून ते 800 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल.

Paytm वर कसं कराल बुकिंग -

- सर्वात आधी Paytm App नसल्यास, ते फोनमध्ये डाउनलोड करावं लागेल.

- त्यानंतर आपल्या गॅस एजेन्सीमधून सिलेंडर बुकिंग करावं लागेल.

- यासाठी Paytm App मध्ये Show more वर क्लिक करा.

- आता Recharge and Pay Bills वर क्लिक करा.

(वाचा - तुम्ही Oximeter चा चुकीचा वापर तर करत नाही ना? केंद्राने सांगितली योग्य पद्धत)

- त्यानंतर book a cylinder चा पर्याय दिसेल.

- येथे तुमचा गॅस प्रोव्हाईडर सिलेक्ट करा.

- बुकिंगआधी FIRSTLPG प्रोमो कोड टाकावा लागेल.

- बुकिंग केल्यानंतर 24 तासांच्या आत कॅशबॅकचं स्क्रॅच कार्ड मिळेल.

- या स्क्रॅच कार्डचा 7 दिवसांमध्ये वापर करावा लागेल.

(वाचा - ATM मधून पैसे काढण्यासाठी असा केला जातोय फ्रॉड,बँकांकडून सुरक्षा वाढवण्याचा आदेश)

पेटीएमने या ऑफरला‘फर्स्ट टाइम’असं नाव दिलं आहे. म्हणजेच या ऑफरचा फायदा तेच लोक घेऊ शकतात, जे पहिल्यांदा गॅस सिलेंडरचं बुकिंग पेटीएमवरुन करतील. त्यामुळे आधी पेटीएमवरुन गॅस सिलेंडर बुक केलेल्या ग्राहकांना या ऑफरचा फायदा मिळणार नाही.

Paytm ने पहिल्यांदाच आपल्या ग्राहकांना अशी ऑफर केलेली नाही. याआधीही पेटीएमकडून LPG गॅस सिलेंडर बुकिंगवर ऑफर देण्यात आल्या आहेत. यापूर्वी कंपनीकडून 700, 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक देण्यात आला आहे. या महिन्यासाठी 800 रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जात आहे.

First published:

Tags: Gas, LPG Price, Paytm offers