मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /फोन हरवलाय? असा करा फोन ब्लॉक, तुमचे पर्सनल डिटेल्स राहतील सुरक्षित

फोन हरवलाय? असा करा फोन ब्लॉक, तुमचे पर्सनल डिटेल्स राहतील सुरक्षित

मोबाईल

मोबाईल

सध्याच्या काळात मोबाइल फोन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आपण आपल्या स्मार्टफोनचा वापर फक्त फोन करण्यासाठीच करत नाही, तर इतर कामांसाठीदेखील करतो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : सध्याच्या काळात मोबाइल फोन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आपण आपल्या स्मार्टफोनचा वापर फक्त फोन करण्यासाठीच करत नाही, तर इतर कामांसाठीदेखील करतो. या कामांमध्ये शॉपिंग, फोटोग्राफी आणि बँकिंग या आणि अशाच आणखी काही गोष्टींचा समावेश असतो. अशा परिस्थितीत फोनमध्ये आपल्या पर्सनल माहितीच्या सोबतच बँक डिटेलही असतात. त्यामुळे आपला फोन चोरी झाल्यास आपल्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते.

    या शिवाय चोरीला गेलेला किंवा हरवलेला फोन शोधणंही खूप कठीण आहे. मात्र, तुम्ही IMEI नंबरच्या मदतीने सरकारी पोर्टल सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्ट्रीला (CEIR) भेट देऊन तुमचं डिव्हाइस म्हणजेच फोन ब्लॉक करू शकता. याच्या मदतीने तुमचा चोरीला गेलेला फोन सापडू शकत नाही, पण याद्वारे तुम्ही तुमची माहिती लीक होण्यापासून वाचवू शकता. चला तर मग जाणून घेऊया की तुम्ही तुमचा चोरीला गेलेला फोन कसा ब्लॉक करू शकता.

    हेही वाचा -  दिवाळीनंतर 7 टक्क्यांनी स्मार्टफोन महाग होण्याची शक्यता, काय कारण?

    चोरीला गेलेला फोन कसा ब्लॉक करायचा?

    फोन ब्लॉक करण्यासाठी, सर्वात आधी तुमच्या डिव्हाइसवर CIER (Central Equipment Identity Registry) उघडा. आता तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला एक फॉर्म दिसेल.

    यात 3 सेक्शन असतील, ज्यामध्ये Device Information, Lost Information आणि Mobile Owner Personal Information चा समावेश असेल.

    यामधून, Device Information सेक्शन निवडा आणि आता तुम्हाला हरवलेल्या फोनची माहिती म्हणजे मोबाइल नंबर, IMEI 1, डिव्हाइस ब्रँड, मॉडेल नंबर इत्यादी भरावं लागेल. यानंतर Lost Information सेक्शनमध्ये जा. इथे फोन चोरीची तारीख, जिल्हा, पोलीस स्टेशन, पोलीस तक्रार क्रमांक इत्यादी माहिती टाका. त्यानंतर शेवटच्या सेक्शनमध्ये जा आणि डिव्हाइस मालकाचे नाव, आयडी प्रूफ, ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर इत्यादी भरा.

    यानंतर खाली येणार्‍या डिक्लेरेशनच्या बॉक्सवर टिक करा आणि Get OTP ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही टाकलेल्या नंबरवर एक OTP येईल. आता OTP टाका आणि नंतर खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला एक रिक्वेस्ट आयडी नंबर मिळेल. याच्या मदतीने तुम्ही नंतर IMEI अनब्लॉक करू शकाल. अशाप्रकारे तुम्ही तुमचा फोन सहज ब्लॉक करू शकता. IMEI म्हणजे इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी हा 15 अंकी क्रमांक असतो. सर्व डिव्हाईसचा नंबर हा वेगळा असतो. त्याच्या मदतीने तुम्ही तुमचा हरवलेला फोन ब्लॉक करू शकता.

    First published:

    Tags: Mobile, Smartphone, Tech news, Technology