नवा फोन घेताय? मग या 5 गोष्टी ठेवा लक्षात !

नवा फोन घेताय? मग या 5 गोष्टी ठेवा लक्षात !

फोनमध्ये सध्याची मागणी म्हणजे चांगला कॅमेरा, भरपूर स्टोरेज आणि जलद प्रोसेसिंग. जाणून घ्या एका फोनमध्ये सर्व सुविधा आणि फीचर पाहताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात.

  • Share this:

मुंबई, 4 जुलै : तंत्रज्ञानाच्या जगात स्मार्टफोन ही माणसाची गरज बनली आहे. त्यामुळेच बाजारात विविध प्रकारचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. प्रत्येक मोबाइल कंपनी काहीतरी नवीन टेक्नोलॉजी आणि फीचर देण्याच्या शर्यतीत आहे.  त्यामुळे इतके सर्व पर्याय उपलब्ध असताना नवा फोन निवडणं हे गोंधळाचं काम आहे. फोनमध्ये सध्याची मागणी म्हणजे चांगला कॅमेरा, भरपूर स्टोरेज आणि जलद प्रोसेसिंग. जाणून घ्या एका फोनमध्ये सर्व सुविधा आणि फीचर पाहताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात.

जिओचा धमाका: 200 रुपयात मिळवा अनलिमिडेट फायदे!

प्रोसेसर – वेगवेगळ्या फोननुसार प्रोसेसिंग पावर बदलु शकते. ते विविध घटकांवर अवलंबून असतं. ऑपरेटिंग सिस्टिम, युजर इंटरफेस आणि ब्लोटवेअर यांवर फोनचा प्रोसेसर किती आहे ते ठरतं. त्यामुळे फोन निवडताना त्याचं प्रोसेसिंग गिगाहट (GHz) मध्ये किती आहे हे पहावं. जितका जास्त त्याचा स्पीड असेल तितका जलद तुमचा फोन काम करेल. त्याने फोन कमी हॅंग होतो आणि त्याचं काम न अडखळता होतं. ज्यांचा फोनचा वापर अधिक आहे त्यांनी स्मार्टफोन निवडताना प्रोसेसिंग पाहताना क्वालकोम स्न्यॅपड्रायगन 652 किंवा 820 ते 821 इतकं घ्यावं. याने फोनवर एकावेळी अनेक कामं करताना अडथळा येच नाही आणि स्पीडी कमी होत नाही.

बॅटरी – तुम्ही फोनवर व्हिडिओ असणारे अँप अधिक वापरता का? किंवा तुम्ही फोनवर गेम खेळता का? असं असल्या, तुमच्या फोनला गरज आहे ती भरपूर वेळ चालणाऱ्या बॅटरीची. कारण, गेम आणि व्हिडिओ असणारे अँप नेहमीपेक्षा जास्त बॅटरी खेचून घेतात. याशिवाय जर तुम्ही एकावेळी बरेच टॅब किंवा अँप चालू ठेवता तर बॅटरीची क्षमता जास्त असणे आवश्यक आहे. त्यासाठी 3500 mAH किंवा त्याहून अधिक क्षमता असलेली बॅटरी पहावी आणि मगच फोन निवडावा.

मेमरी – फोनमध्ये असणारी मेमरी जास्त असल्यास फोनमध्ये जास्त फाईल ठेवता येतात, भरपूर अँप घेता येतात आणि फोटो आणि व्हिडीओ ही जास्त काढता येतात.  फोनमध्ये असणारी RAM (random access memory) जास्त असल्यास तुम्ही भरपूर फाईल स्टोअर करुन ठेऊ शकता. शिवाय फोनही जलद गतीने चालतो. फोनमधील ROM (Read Only Memory) जास्त असल्यास जास्त स्टोरेज मिळतं. सर्वसाधारणपणे 16 जिबी  ROM आणि 2 जिबी RAM पुरेसा होतं. पण, तुम्हाला जास्त स्टोरेजची आवश्यकता असल्यास 64 GB ROM आणि 3 to 4 GB RAM इतक्या मेमरीचा फोन घ्यावा.

कॅमेरा – कॅमेरा हे फीचर सगळ्याच स्मार्टफोन युजर साठी महत्त्वाचं आहे. फोटो काढण्यासाठी, शुटींग करण्यासाठी किंवा व्हिडिओ काढण्यासाठी चांगला कॅमेरा असणं गरजेचं आहे. चांगल्या कॅमेराची व्याख्या करायची म्हणजे तो किती मेगापिकसलचा आहे हे महत्त्वाचं आहे. पण एवढचं पुरेसं नसून त्यासोबत ISO, ऑटोफोकस, अपरचर हे फीचर ही तितकेच महत्त्वाचे आहेत. 12 ते 16 मेगापिकसलचा आणि f/2.0 इतका अपरचर असणारा कॅमेरा उत्तम ठरु शकेल.

मजबूतपणा – फोन किती काळ चालेल हे पूर्णपणे त्याच्या मजबूतपणावर अवलंबून आहे. याचा अर्थ असा की, फोनची मागील बाजू मेटलची आहे की प्लास्टीकची हे पहावं. फोन आपल्याकडून अनेकदा खाली पडतो आणि त्याची बॉडी मजबूत असल्यास तो भरपूर काळ टिकू शकतो. याशिवाय मोबाइल फोनच्या स्क्रिनला तुम्ही ग्लास प्रोटेक्शन लावलं पाहिजे.

Google वर 'हे' सर्च करून बघा, स्क्रीनवर होईल फटाक्यांची आतषबाजी!

बाजारात नुकताच OnePlus या कंपनीचा 7 Pro हा फोन लॉन्च झाला आहे. सध्या OnePlus च्या फोनला प्रचंड पसंती मिळत असून तो आयफोनला चांगलीच टक्कर देत आहे.

VIDEO : वामन हरी पेठेतून तब्बल 27 कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी

First published: July 5, 2019, 7:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading