तुमच्या चेहऱ्यात असतील 'या' गोष्टी तर मिळतील 92 लाख रुपये!

तुमच्या चेहऱ्यात असतील 'या' गोष्टी तर मिळतील 92 लाख रुपये!

एक कंपनी काही अटींवर चेहऱ्याचा शोध घेत असून यासाठी त्यांनी 92 लाख रुपये देणार असल्याचं सांगितलं आहे.

  • Share this:

लंडन, 22 ऑक्टोबर : टेक कंपनी जिओमिक सध्या रोबोसाठी एक असा चेहरा शोधत आहे जो 'माणसा'सारखा असेल. यासाठी कंपनीने संबंधित व्यक्तीला 92 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. कंपनीने त्यांच्या नव्या रोबोसाठी हव्या असणाऱ्या चेहऱ्याबाबत काही अटी ठेवल्या आहेत. चेहऱ्यावर दयाळूपणा आणि मैत्रीपूर्ण भाव दिसले पाहिजेत असं कंपनीने म्हटलं आहे. यासाठी त्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा करार केला जाईल आणि रक्कम दिली जाईल. कंपनी रोबोला हुबेहुब माणसासारखा चेहरा देण्यासाठी प्रयत्न करत आहे.

जिओमिक कंपनीने सांगितलं की, रोबोचे नाव व्हर्च्युअल फ्रेंड ठेवण्याचा विचार सुरू आहे. पुढच्या वर्षीपर्यंत हा रोबो तयार होईल. दरम्यान त्याच्या चेहऱ्यासाठी शोध सुरू केला आहे. कंपनीने यासाठी अनेक चेहऱ्यांची चाचणी केली आहे. निव़ड करण्यात आलेल्यांना त्याचा मोबदला दिला आहे.

रोबोसाठी मानवी चेहऱ्याची मागणी करणं हे जरा विचित्र वाटत असेल. पण कंपनी अशा चेहऱ्यांचा शोध घेत आहे जे वेगळे दिसत असतील. कोणत्याही व्यक्तीला करार केल्यानंतर त्याच्या चेहऱ्याला एका रोबोटसाठी तयार केलं जाईल. त्यानंतर रोबो माणसासारखा दिसेल. त्याची वेगळी ओळख असेल.

रोबोटिक्स कंपनी असलेल्या जिओमिक त्यांच्या या प्रोजेक्टवर गेल्या 5 वर्षांपासून काम करत आहे. अत्यंत गोपनीय असा हा प्लॅन असून याच्याशी संबंधित कोणतीही माहिती कंपनीने बाहेर जाणार नाही याची काळजी घेतली होती. आता कंपनी रोबोच्या चेहऱ्यासाठी शोध घेत आहे. ज्या चेहऱ्यांची निवड केली जाईल त्यांची माहिती रोबोमध्ये देण्यात येईल.

VIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास

First published: October 22, 2019, 3:23 PM IST
Tags: technology

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading