Home /News /technology /

लॉकडाऊनमध्ये Airtelचा सर्वात स्वस्त प्लॅन! या रिचार्जवर मिळणार 50 GB ज्यादा डेटा

लॉकडाऊनमध्ये Airtelचा सर्वात स्वस्त प्लॅन! या रिचार्जवर मिळणार 50 GB ज्यादा डेटा

कंपनीने 98 रुपयांच्या डेटा प्लॅनमध्येही बदल केला आहे. आधी 6 जीबी डेटा मिळत होता त्याऐवजी आता 12 जीबी मिळणार आहे.

    मुंबई, 24 मे : jio आणि वोडाफोनला टक्कर देण्यासाठी भारतीय एअरटेल कंपनीनं आपल्या ग्राहकांसाठी खास नवीन प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन लाँच करण्यामागचं कारणही तेवढंच महत्त्वाचं आहे. लॉकडाऊनमुळे Work from home करणाऱ्या आणि घरी असलेल्या तरुणांसाठी हा विशेष प्लॅन आहे. एअरटेल कंपनीने स्वस्त आणि मस्त डेटा पॅक लाँच केला आहे. 251 रुपयांमध्ये ग्राहकांना आता 50 GB अतिरिक्त डेटा मिळणार आहे. त्यामुळे जे Work From Home करतात त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी हा खास प्लॅन असेल. इतर दूरसंचार कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी कंपनीने हा प्लॅन लाँच केला. एअरटेलच्या या व्हाउचरची सर्वात खास बाब म्हणजे त्यात 50 जीबी अमर्यादित डेटा ऑफर उपलब्ध आहे. 251 रुपयांच्या प्लॅनमध्ये 50 GB अतिरिक्त डेटा मिळणार असून त्यासाठी कोणतीही वैधता असणार नाही असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. हे वाचा-तुमच्या फोनवर असू शकतो हा व्हायरस, Whatsapp आणि Facebook वापरताना घ्या काळजी 6 GB डेटा मिळतोय फ्री कंपनीने 98 रुपयांच्या डेटा प्लॅनमध्येही बदल केला आहे. आधी 6 जीबी डेटा मिळत होता त्याऐवजी आता 12 जीबी मिळणार आहे. त्याची वैधता 28 दिवस असणार आहे. म्हणजेच या 98 रुपयांच्या योजनेत ग्राहकांना 12 जीबीचा हाय-स्पीड इंटरनेट डेटा दिला जात आहे. हे वाचा-इन्स्टाग्रामवर करता येणार एका वेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल, वाचा काय करावे लागेल हे वाचा-लॉकडाऊनमध्ये खूशखबर! 349 रुपयांमध्ये मिळणार आता 3 GB डेटा संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Airtel, Coronavirus

    पुढील बातम्या