मुंबई, 10 एप्रिल : मोबाईल ही एक सर्वात महत्त्वाची गरज बनली आहे. आपल्या आयुष्याचा विचार करता येईल का? कदाचित आजकाल सर्वच वयोगटातील लोकांसाठी फोन ही महत्त्वाची गोष्ट आहे. आताच्या घडीला फोनशिवाय जगण मुश्कील होऊन जातं. अशातच आपला आताच्या घडीला मोबाईल बंद पडला किंवा सिम खराब झालं तर जीव अर्धा होतो. मोबाईलमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे सिम. त्यात आहे लॉकडाऊन म्हणजे आताच्या घडीला जर सिमकार्ड खराब झालं तर पुन्हा ते नीट करायला किंवा दुसरं घेण्यासाठीही लॉकडाऊन संपण्याची वाट पाहावी लागेल. जर लॉकडाऊनमध्ये काही कारणामुळे आपले सिम कार्ड खराब झाले किंवा गमावले तर आपण काय कराल, हा विचारच आपल्याला त्रास देणार किंवा ताण आपणणार वाटतो.
पण आता तुम्हाला काळजी कऱण्याची गरज नाही. कारण नवीन सिम कार्ड मिळण्यासाठी केवळ अर्ध्या तासापासून ते 4 दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर तुम्ही पुन्हा सिमकार्ड सुरू करू शकता. ज्या ग्राहकांनी नवीन सिम घेतलं होतं त्यांना सुरू होऊ न शकल्यामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे.
हे वाचा-पृथ्वीवर आणखी एका संकटाची चाहूल, ओझोनवरील छिद्र 1 दशलक्ष चौरस किलोमीटर वाढलं
मोबाइल ग्राहकांना नवीन सिम घेण्यासाठी किंवा त्यांचे सिमकार्ड बदलण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांच्या दुकानात जावे लागणार नाही. नवीन सिम घेणाऱ्या ग्राहकाच्या घरी व्हेरिफिकेशन प्रकियेला मंजुरी मिळावी असं दूरसंचार कंपन्यांनी दूरसंचार विभागाकडे त्यासंदर्भात मागणी केली आहे . विभागाने हे मंजूर केल्यास दूरसंचार कंपन्या नवीन ग्राहक जोडण्याची प्रक्रिया सुरू ठेवू शकतील. लॉकडाऊनमुळे सिमकार्डच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याची माहिती मिळत आहे.
सिमकार्ड घरीच ग्राहकांना दिले जाईल टेलिकॉम कंपन्यांनी दूरसंचार विभागाकडे मागणी केली आहे. ग्राहकांच्या पडताळणीच्या प्रक्रियेस संपूर्ण संपर्क साधण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्राहकांना त्याची कागदपत्रे ऑनलाइन पोर्टलवर द्यावी लागतात. दस्तऐवजाच्या आधारे नवीन सिम कार्ड वितरित केले जाईल. सिमकार्ड त्याच्या घरी ग्राहकांना देण्यात येईल.
सिमकार्ड खराब झालं की टेलिकॉमच्या कार्यालयात जाऊन व्हेरिफिकेशन करावं लागतं. त्यानंतर नवीन सिमकार्ड किंवा आधीचा नंबर असलेलं नवीन सिम मिळत. सध्या हीच प्रक्रिया वापरली जात आहे. तुमचं आधारकार्ड जर सिमला जोडलं तर अर्ध्या तासात सिम सुरू होतं. अन्यथा ट्रायच्या नियमानुसार 4 दिवस लागतात.
हे वाचा-पोस्टाच्या या योजनेचा प्रीमियम भरण्याची मुदत वाढवली,13 लाख पॉलिसीधारकांना दिलासा
संपादन- क्रांती कानेटकर