Home /News /technology /

Flipkartकडून शॉपिंगसाठी ग्राहकांना लोनची सुविधा; या बँकांसोबत करार, ग्राहकांना असा होणार फायदा

Flipkartकडून शॉपिंगसाठी ग्राहकांना लोनची सुविधा; या बँकांसोबत करार, ग्राहकांना असा होणार फायदा

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टकडून देशभरातील ग्राहकांना फेस्टिव्ह सीजनदरम्यान सहजपणे लोनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने (Flipkart) फेस्टिव्ह सीजनदरम्यान, ग्राहकांना 17 बँका, नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या (Non Banking Financial Company) आणि फिनटेक क्षेत्रातील कंपन्यांद्वारे लोनची (Loan) सुविधा उपलब्ध केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील ग्राहकांना फेस्टिव्ह सीजनदरम्यान सहजपणे लोनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विविध क्षेत्र आणि पिन कोडद्वारे, लोनच्या प्रकरणात नवीन असलेल्या लोकांना लक्ष करण्याचा फ्लिपकार्टचा उद्देश आहे. फेस्टिव्ह सीजनदरम्यान, या लोकांना मार्केटप्लसवर 25 कोटींहून अधिक प्रोडक्टचा पर्याय उपलब्ध आहे. आता Paytm वरून पेमेंट करणं महागणार... प्रत्येक भारतीयाला कमी किंमतीत ऑनलाईन शॉपिंगची सुविधा उपलब्ध करण्यासाठी, 17 प्रमुख बँका, एनबीएफसी (Non Banking Financial Company) आणि फिनटेक कंपन्यांद्वारे ग्राहकांना स्वस्तात कर्जाची सुविधा उपलब्ध करणार असल्याचं फ्लिपकार्टकडून सांगण्यात आलं आहे. सावधान! ऑनलाइन शॉपिंग करताना नकली सामान देऊन होतेय फसवणूक, वाचा अशावेळी काय कराल फ्लिपकार्टने भारतीय स्टेट बँक (SBI) आणि एसबीआय कार्डशी (SBI Card) करार केला आहे. याअंतर्गत डेबिट आणि क्रेडिट कार्डधारकांना तात्काळ 10 टक्क्यांची सूट उपलब्ध होईल. त्याशिवाय बजाज फिनसर्वच्या ईएमआय कार्डधारकांना ईएमआयवर कोणतंही शुल्क लागणार नाही. फ्लिपकार्टने गिफ्ट कार्ड स्टोरही सुरू केलं आहे, जे कल्याण ज्वेलर्स, क्रोमा, फॅब इंडिया आणि केएफसीसारख्या 60 ब्रँडअंतर्गत ग्राहकांच्या गरजा पुरवल्या जाणार आहेत. Tricks and Tips: Google प्ले स्टोरमध्ये करा या 3 सेटिंग्स; बॅटरीसह डेटाचीही बचत
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    पुढील बातम्या