मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

ही कंपनी करणार Electric Vehicle सेगमेंटमध्ये करणार धमाकेदार कमबॅक, E-Scooter ची केली घोषणा

ही कंपनी करणार Electric Vehicle सेगमेंटमध्ये करणार धमाकेदार कमबॅक, E-Scooter ची केली घोषणा

LML इलेक्ट्रिक स्कूटर प्रीमियम सेगमेंटमध्ये असतील. अशात बाजारात ही स्कूटर Ola S1 आणि Ola S1 Pro ला मोठी टक्कर देईल असा दावा LML कडून करण्यात आला आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर : एके काळात बजाज चेतकला (Bajaj Chetak) जबरदस्त टक्कर देणारी LML स्कूटर पुन्हा एकदा बाजारात येणार आहे. कानपूरच्या या टू-व्हिलर ब्रँडने आता इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची योजना आखली आहे. LML स्कूटर लाँच झाल्यास अनेक मोठ्या ब्रँड्सला मोठी टक्कर देईल असं बोललं जात आहे.

2000 दशकापर्यंत स्कूटर आणि मोटरसायकल विक्री करणारी कंपनी लोहिया मशीनरी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना नुकताच एक इन्व्हेस्टमेंट पार्टनरकडून मोठी गुंतवणूक मिळाली आहे. त्यामुळे कंपनी भारतीय बाजारात पुन्हा एकदा एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. एके काळात LML ची NV स्कूटर देशातील मध्यवर्गीयांच्या घरातील ओळख होती. LML ची Freedom मोटरसायकल तरुणांमध्ये खास प्रसिद्ध होती.

LML Electric चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश भाटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी बाजारात एक असं प्रोडक्ट लाँच करणार आहे, जे अनेक कंपन्यांसाठी आव्हान ठरेल. LML इलेक्ट्रिक स्कूटर प्रीमियम सेगमेंटमध्ये असतील. अशात बाजारात ही स्कूटर Ola S1 आणि Ola S1 Pro ला मोठी टक्कर देईल असा दावा LML कडून करण्यात आला आहे.

Ola ने इलेक्ट्रिक स्कूटर S1 ची विक्री थांबवली; कंपनीने दिलं असं कारण

देशात इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये मोठी वाढ होत आहे. देशभरात पेट्रोलच्या गगनाला भिडणाऱ्या किमती आणि इलेक्ट्रिक गाड्यांवर सरकारकडून देण्यात येणारी मोठी सब्सिडी हे इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये वाढ होण्याचं मोठं कारण आहे.

First published: