Home /News /technology /

शाब्बास! एका चिमुरडीनं केली Googleची मदत, हटवले 4 कोटींची कमाई करणारे धोकादायक अ‍ॅप्स

शाब्बास! एका चिमुरडीनं केली Googleची मदत, हटवले 4 कोटींची कमाई करणारे धोकादायक अ‍ॅप्स

झेक प्रजासत्ताकमध्ये राहणाऱ्या एका चिमुरडीने गुगलला मदत करत असे सात अ‍ॅप्स शोधण्यास मदत केली, जे लहान मुलांसाठी धोकादायक आहेत.

    नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : गुगल प्ले स्टोअर (Google play store) आणि अ‍ॅपल स्टोअरवरील (Apple play store) अ‍ॅप्स अनेक सेक्युरिटी चेक केल्यानंतर टाकले जातात. मात्र असे असले तरी स्कॅमर्स युझरनं बर्‍याच अ‍ॅप्सच्या मदतीने नुकसान पोहोचवू शकतात. आता लहान मुलांना लक्ष्य करणाऱ्या अशाच तब्बल 24 लाख अ‍ॅप्स आढळून आले आहेत. विशेष गोष्ट अशी आहे की या हे धोकादायक अ‍ॅप्स शोधण्यात एका लहान मुलीने गुगलला मदत केली आहे. हे अ‍ॅप्स आता गुगलवरून काढून टाकण्यात आले आहेत. झेक प्रजासत्ताकमध्ये राहणाऱ्या एका चिमुरडीने गुगलला मदत करत असे सात अ‍ॅप्स शोधण्यास मदत केली, जे लहान मुलांसाठी धोकादायक आहेत. या अ‍ॅप्सने स्कॅम करत तब्बल 3.7 कोटींची कमाई केली होती. SensonTower ने दिलेल्या वृत्तानुसार, असे एकूण 7 अ‍ॅप्स आढळून आले आहेत, जे अ‍ॅडवेअर स्कॅमच्या मदतीने युझरना नुकसान पोहचवून पैसे कमावत होते. हे अ‍ॅप्स युझरना करमणूक, वॉलपेपर आणि म्यूजिक अ‍ॅप्सच्या रुपाने युझरना जाहिरातील दाखवत होता, विशेषतः लहान मुलांना लक्ष करत हे अ‍ॅप्स काम करत होते. वाचा-सावधान! फेक ऑक्सिमीटर App वापरणं ठरू शकतं धोकादायक चिमुरडीने रिपोर्ट केले अ‍ॅप्स झेक प्रजासत्ताकमध्ये 'Be Safe Online Project' सुरू करण्यात आला होता. यात मुलांना ऑनलाइन सुरक्षित कसे रहायचे हे सांगितले जात होते. या चिमुरडीने TikTok प्रोफाइलवर स्कॅम करणाऱ्या अ‍ॅप्सच्या जाहिरातीची बातमी दिली, त्यानंतर हा संपूर्ण मुद्दा समोर आला आणि हे अॅप्स काढून टाकण्यात आले. खरतर, Instagram आणि TikTok सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या अ‍ॅप्सची जाहिरात देखील केली जात होती. वाचा-Apple online store India : नव्या ॲपल स्टोअरमधून आयफोन घ्यावा की नाही? गुगलने हटवले सातही अ‍ॅप्स अ‍ॅप्सविषयी गूगल आणि अ‍ॅपल दोघांनाही अलर्ट केले हे अ‍ॅप्स प्ले स्टोअरमधून काढून टाकण्यात आले आहेत. हे अॅप्स जाहिराती दाखवून युझरकडून 2 ते 10 डॉलर पैसे वसूल करत होते. यातील काही अ‍ॅप्स गेम्स संबंधित होते तर, काहींच्या मदतीने तुम्ही वॉलपेपर बदलू शकतात. कोट्यावधी फॉलोअर्ससह सोशल मीडिया अकाउंटवर या अ‍ॅप्सची जाहिरात करण्यात येत होती.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Google

    पुढील बातम्या