Monsoon in India: माणसांप्रमाणे आपल्या कारचीही घ्यावी लागते काळजी; 'या' टिप्स ठरतील उपयोगी

या पावसाळी वातावरणात आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागते, तसंच आपल्या कारच्या प्रकृतीचीही (Car) काळजी घ्यावी लागते. त्यासाठी या काही टिप्स (Tips) उपयुक्त ठरतील.

या पावसाळी वातावरणात आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागते, तसंच आपल्या कारच्या प्रकृतीचीही (Car) काळजी घ्यावी लागते. त्यासाठी या काही टिप्स (Tips) उपयुक्त ठरतील.

  • Share this:
मान्सूननं (Monsoon) यंदा देशात वेळेआधीच हजेरी लावली असून, तो वेगाने पुढे सरकत आहे. या पावसाळी वातावरणात आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागते, तसंच आपल्या कारच्या प्रकृतीचीही (Car) काळजी घ्यावी लागते. त्यासाठी या काही टिप्स (Tips) उपयुक्त ठरतील. वेळेवर सर्व्हिसिंग करा सर्वांत आधी आपल्या कारचं सर्व्हिसिंग (Servicing) वेळेवर करा, जेणेकरून कार पावसाळ्यात व्यवस्थित धावू शकेल. पावसाळ्यात कार बंद पडण्याचं प्रमाण अधिक असतं. टायर, वायपर आणि ब्रेक शूची काळजी घ्या पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपल्या वाहनाचे टायर (Tyre), वायपर (Wiper) आणि ब्रेक शू (Break Shoe) तपासून घ्या. पावसात अनेकदा रस्ता निसरडा होतो. आपल्या वाहनाचे टायर फारच झिजले असतील तर ते त्वरित बदलून घ्या. वायपर खराब झाले असतील तर प्रवास करणं खूप अवघड असतं. त्यामुळे वायपर चांगल्या स्थितीत असणं आवश्यक आहे. बॅटरी तपासा पावसाळा सुरू होताच बॅटरीची (Battery) स्थिती आणि तिची ग्रॅव्हिटी तपासा. बॅटरीची स्थिती चांगली नसेल आणि तुम्ही पावसात कुठे तरी अडकलात तर वाहन चालवणं कठीण होईल. वास्तविक, पावसात, बॅटरीच्या टर्मिनल्सवर एक पांढरा थर निर्माण होतो. यामुळे स्टार्टिंगला (Starting) अडचण येऊ शकते. कोणत्याही कारणानं बॅटरी स्टार्टिंगला समस्या असल्यास, ती बदलून घ्या किंवा मेकॅनिकला दाखवा. हे ही वाचा-आता कारसारखीच बाईकही राहणार सुरक्षित, ट्रॅक करता येणार लोकेशन! क्लच दुरुस्त करा पावसाळ्यात गाडीचा क्लच (Clutch) दुरुस्त करून घ्या. कारचा क्लच नीट काम करत असेल, तर पाणी किंवा चिखलात कार अडकली तरी गिअर्सच्या (Gears) साह्याने सहजपणे बाहेर काढता येते. ब्रेकची काळजी घ्या पावसाळ्यात ब्रेकची (Break) काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पाण्यामुळे कारचे ब्रेक थोडेसे कमकुवत होतात. अशा परिस्थितीत ब्रेकची काळजी आवश्यक आहे. पावसाळ्यात अती वेगानं कार चालवणं टाळा. तसंच आवश्यकतेनुसार ब्रेक पॅड बदलत राहा. कार स्वच्छ ठेवा पावसाळ्याच्या दिवसांत कार नेहमी स्वच्छ (Clean) ठेवा. गंज (Rust) टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा. कारचे मड फ्लॅप (Mud Flap) वारंवार स्वच्छ करा. कारच्या मुख्य भागाखाली अँटी-रस्ट (Anti Rust) पेंट वापरा. कारमधला फ्लोअर मॅट (Floor Mat) आणि सीट कव्हर्सही (Seat Covers) नेहमी स्वच्छ ठेवा. रस्त्याच्या कडेनं कार चालवणं टाळा कार चालवताना आपण रस्त्याच्या (Road) मध्यभागी राहाल याची काळजी घ्या. रहदारीत हे शक्य नाही. परंतु महामार्गावरून (Highway) कार चालवताना रस्त्याच्या कडेनं चालवणं टाळा. यामुळे अपघाताची शक्यता कमी होते.
Published by:Meenal Gangurde
First published: