Home /News /technology /

90 डिग्री रोटेटिंग स्क्रिनवाला स्मार्टफोन भारतात लाँच; जाणून घ्या काय आहे किंमत

90 डिग्री रोटेटिंग स्क्रिनवाला स्मार्टफोन भारतात लाँच; जाणून घ्या काय आहे किंमत

येत्या 9 नोव्हेंबरपासून भारतात LG Wingची विक्री सुरू होणार आहे. भारताआधी हे मॉडेल दक्षिण कोरियामध्ये लाँच झालं होतं.

    नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : दक्षिण कोरियाई कंपनी एलजीने (LG) भारतात एक जबरदस्त स्मार्टफोन एलजी विंग (LG Wing) लाँच केला आहे. एलजी विंग ड्युअल कॅमेरा डिस्प्ले, दोन बेसिक मोड आणि स्विवेल (Swivel)मोडसह आहे. ज्यात एक स्क्रिन 90 डिग्रीवर रोटेट (Rotate) होते. फोन रोटेट केल्यानंतर फोनचा आकार टी (T) होतो. फोनमध्ये दोन्ही स्क्रिनचा वापर एकत्र करण्याची सुविधा आहे. LG Wing स्मार्टफोनच्या 128GB वेरिएंटची किंमत 69990 रुपये आहे. तर या मॉडेलचं 256 GB वेरिएंट भारतात लाँच झालेलं नाही. इल्यूजन स्काय आणि ऑरोर ग्रे या दोन रंगात फोन उपलब्ध आहे. येत्या 9 नोव्हेंबरपासून भारतात LG Wingची विक्री सुरू होणार आहे. भारताआधी हे मॉडेल दक्षिण कोरियामध्ये लाँच झालं होतं. दक्षिण कोरियात याची किंमत 71,400 रुपये इतकी होती. LG Wing स्पेसिफिकेशन्स - - ड्युअल सीम स्मार्टफोन - अँड्रॉईड 10 ऑपरेटिंग सिस्टम - प्रायमरी स्क्रिन 6.8 इंची HD+ P-OLED डिस्प्ले - सेकेंडरी डिस्प्ले 3.9 इंची HD+ G-OLED डिस्प्ले - क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर - 4000mAh बॅटरी - क्विक चार्ज 4.0 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट - 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज 90 डिग्रीपर्यंत फिरतो या अनोख्या स्मार्टफोनचा डिस्प्ले; 28 ऑक्टोबरला भारतात होणार लाँच कॅमेरा - - 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरासह, रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. - 64 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, 13 मेगापिक्सल अल्ट्रा-वाईड लेन्स आणि 12 मेगापिक्सल आणखी एक अल्ट्रा-वाईड लेन्स, असा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. - कॅमेराला गिंबल मोशन कॅमेरा फीचर आहे, जो दुसऱ्या स्क्रिनमध्ये देण्यात आलेल्या व्हर्चुअल जॉयस्टिकच्या माध्यमातून कॅमेरा एंगल नियंत्रित करतो. - पॉप-अप सेल्फी कॅमेरावाला हा LGचा पहिला फोन आहे. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल पॉप-अप फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटी फीचरमध्ये 5जी, 4जी, वाय-फाय 802.11एसी, ब्लूटूथ 5.1, जीपीएस/ ए-जीपीएस आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट सामिल आहे. स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Smartphone

    पुढील बातम्या