वॉशिंग्टन, 11 मार्च : पृथ्वीशिवाय इतर ग्रहावर जीवसृष्टी आहेत का? तिथलं वातावरण काय आहे? याशिवाय अंतराळातील गूढ उलगडण्यासाठी अंतराळ मोहिमा आखल्या जातात. आता अमेरिकन अंतराळ संस्था नासाने अंतराळात भाज्या पिकवण्याचा प्रयोग केला. यामध्ये पहिल्यांदा कोबीसारखी दिसणारी लेट्युसची भाजी पिकवण्यात आली. याचा वापर सॅलाड आणि बर्गरमध्ये सर्वाधिक होतो. नासाच्या संशोधकांनी म्हटलं की अंतराळात उगवण्यात आलेली लेट्युस पृथ्वीवर पिकवलेल्या लेट्युसपेक्षा जास्त पौष्टीक आहे.
अंतराळात भाजी पिकवण्याच्या प्रयोगाची माहिती फ्रंटीयर्स इन प्लांट सायन्स जर्नलमध्ये एक वैज्ञानिक अभ्यास म्हणून प्रकाशित झाली आहे. यामध्ये नासाने पृथ्वीवर आणि अंतराळात उगवण्यात आलेल्या भाज्यांची माहिती दिली आहे. त्यानुसार अंतराळात पिकवलेली लेट्युस पृथ्वीवरच्या लेट्युसशी मिळतीजुळती आहे. मात्र इतर बाबतीत अंतराळातील लेट्युस जास्त चांगली आहे. त्यात पोटॅशिअम, सोडिअम, झिंक यासारखी पोषक द्रव्ये आढळतात.
नासाच्या अंतराळवीरांनी ही भाजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सिरॅमिक माती आणि रेड लायटिंग असलेल्या बंद खोक्यात उगवली. याला इंजेक्शनच्या सहाय्याने पाणी दिलं जात होतं. भाजी पूर्णपणे तयार होण्यास 33 ते 56 दिवसांचा वेळ लागला.
हे वाचा :
फेसबुकला सापडलं नाही ते एका पुणेकराने शोधलं, मिळालं 40 लाखांचं बक्षीस
भाजी उगवल्यानंतर अंतराळवीरांनी त्याची चवही घेतली आणि काही दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ती भाजी पृथ्वीवर आणली होती. लेट्युस पृथ्वीवर आणताच त्याची चाचणी घेतली गेली. तेव्हा मोठ्या संख्येने बॅक्टेरिया त्यामध्ये आढळले. हे बॅक्टेरिया धोकादायक नव्हते असंही स्पष्ट झालं.
नासाने म्हटलं की, अंतराळात भाज्या पिकवणं गरजेचं आहे कारण जास्त काळासाठी मोहिम आखण्यास सोपं जाईल. यामुळे अंतराळविरांना पॅक केलेलं अन्न देण्याशिवाय तिथंच पिकवून खाणंही शक्य होईल. आता इतर भाज्यांवरही प्रयोग होणार आहे.
हे वाचा : धक्कादायक! इटलीमध्ये एका दिवसात 'कोरोना'नं घेतला 336 जणांचा बळी मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.