Home /News /technology /

स्मार्टफोन, सोशल मीडिया, इंटरनेट सर्फींग करताना सावधान! कापला जाऊ शकतो खिसा

स्मार्टफोन, सोशल मीडिया, इंटरनेट सर्फींग करताना सावधान! कापला जाऊ शकतो खिसा

5G च्या आगमनाने तंत्रज्ञान अधिक प्रगत होईल आणि सामान्य लोकांची फसवणूक करण्याच्या पद्धतीही नवीन होतील, अशा परिस्थितीत तुमची दक्षता तुम्हाला फसवणुकीपासून वाचवेल.

    मुंबई, 4 ऑगस्ट : तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जगणं सोपं झालं खरं; पण त्यासोबत अनेक गैरप्रकारही घडू लागले. तंत्रज्ञानाचाच वापर करून ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे घडू लागले. आता आपण 4G कडून 5G कडे जात आहोत. 5G चा फायदा घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. मात्र, या नव्या स्पीड आणि डेटा टेक्नॉलॉजीमुळे (Frauds) फ्रॉडच्या नवनव्या पद्धती ग्राहकांच्या समस्या वाढवू शकतात. त्यांना कसा आळा घालता येतो, टीव्ही 9 हिंदीनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. सिम क्लोनिंगचा धोका सिम क्लोनिंगसाठी (Sim Cloning) बनावट आधारकार्ड तयार केलं जातं. त्यानंतर पोलिसांत सिम हरवल्याची तक्रार दिली जाते. त्या आधारावर टेलिकॉम ऑपरेटरकडून नवीन सिम घेतलं जातं. याचा पत्ता लागेपर्यंत ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतलेले असतात. दुसऱ्या पद्धतीमध्ये ग्राहकांना पेटीएम, बँक अधिकारी, RO वॉटर प्युरिफायर यांच्या नावानं कॉल करून केवायसी (KYC) पूर्ण करण्यास सांगितलं जातं. त्यासाठी लिंक पाठवली जाते. त्यावर क्लिक केल्यास ग्राहकांच्या बँक खात्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते. बनावट कस्टमर केअर क्रमांकाच्या माध्यमातून फसवणूक बनावट कॉल सेंटरकडून काही वेळा बनावट कस्टमर केअर क्रमांक दिले जातात. यासाठी अनेक जणांची टीम काम करत असते. गुगलवर एखाद्या प्रसिद्ध मोठ्या कंपनीची माहिती दिली जाते. त्यासाठी कस्टमर केअरचा बनावट क्रमांक (Fake Customer Care Number) देऊन त्याचा प्रचार केला जातो. ग्राहक कस्टमर केअरचा क्रमांक शोधत असतात. अशा क्रमांकावर फोन केल्यास तुमची सगळी माहिती मिळवून फसवणूक केली जाते. अशा बनावट क्रमांकाबाबत गुगलवर ग्राहकांकडून काही माहिती दिली जात नाही. गुगलकडूनही कधीकधी कारवाई केली जात नाही. त्यामुळे हळूहळू बनावट कस्टमर केअर कंपनीच लोकांना खरी कंपनी वाटू लागते. Smartphone: स्मार्टफोन वापरल्यामुळं स्मरणशक्तीत वाढ होते? अभ्यासातून समोर आले आश्चर्यकारक निष्कर्ष अनेकवेळा ग्राहकांना इंटरनेट कंपनी, टेलिकॉम ऑपरेटर किंवा अन्य कंपन्यांकडून फोन येतात. त्यांच्यापर्यंत तुमची माहिती कशी पोहोचते हे जाणून घेतलं आहे का? ऑनलाईन सर्चिंग डेटावर अनेकांचं लक्ष असतं. कधीकधी हा डेटा डार्क वेबवर विकलाही जातो. बनावट कॉल सेंटरवाले (Fake Call Centre) हा डेटा खरेदी करतात व त्यातून बनावट कॉल्स ग्राहकांना येतात. हॅकर्सकडून चोरी केली जाते. ग्राहकांची रेकीही केली जाते व फसवणूक होते. यासाठी फोनवर कोणतीही खासगी माहिती देऊ नका. तुमची फसवणूक करण्यासाठी कोणी एक व्यक्ती काम करत नाही, तर एक मोठी टोळी ते करत असते. बनावट कॉल सेंटरमध्ये याच पद्धतीनं काम चालतं. एक जण ग्राहकाशी फोनवर उत्पादनासंदर्भात बोलतो. एक जण सोशल मीडियावरचं ग्राहकाचं अकाउंट तपासत असतो. एक जण डार्क वेबवरची माहिती गोळा करत असतो, तर कोणी बँक खात्याची माहिती काढण्याचा प्रयत्न करत असतो. तुमच्या सगळ्या माहितीला एकत्र केलं जातं. मात्र, ग्राहकांना याची थोडीही कल्पना येत नाही. आता क्युआर कोडद्वारेही (QR Code Fraud) फसवणुकीचे गुन्हे घडू लागले आहेत. एका चौकोनाच्या आत आकारांचा वेगळा पॅटर्न असतो, त्याला क्युआर कोड म्हणतात. प्रत्येक क्युआर कोडमध्ये वेगवेगळा पॅटर्न असतो. क्युआर म्हणजेच क्विक रिस्पॉन्स कोड. हा कोड स्कॅन केल्यावर एक लिंक जनरेट होते. क्युआर कोडमध्ये ही लिंक असते. त्याद्वारे ग्राहकांना त्या वेबसाईटवर रिडायरेक्ट केलं जातं. तिथे एखादं बटण दाबायला सांगितलं जातं. यामुळे ग्राहकांच्या बँक खात्याची माहिती त्यांना मिळते. पैसे देण्यासाठी व घेण्यासाठीही क्युआर कोडचा वापर करता येतो. तुमचा कोड कोणासोबत शेअर केला, तर त्या कोडचा वापर करून ती व्यक्ती तुम्हाला पैसे देऊ शकते. फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये क्युआर कोड स्कॅन करून पैसे मिळण्याऐवजी तुमचेच पैसे खात्यातून जातात. फसवणुकीला आळा घालण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरनेटवरील कंपन्यांच्या खऱ्या वेबसाईटवर जाऊन तिथे तुमची तक्रार करा. एखादं पार्सल ऑर्डर केलं व त्याला उशीर झाला, तर गुगल करून कस्टमर केअर क्रमांक शोधण्यापेक्षा त्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन तुमची तक्रार नोंदवा. ट्वीटर किंवा इतर सोशल मीडियामध्ये तुम्ही तक्रार नोंदवत असताना ऑर्डर क्रमांक तिथे द्या. तुमचा मोबाईल किंवा ईमेल आयडी तिथे शेअर करू नका. मोबाईल फोनला लॉक ठेवा. बँकेचे, नेट बँकिंगचे, सोशल मीडियाचे पासवर्ड्स सतत बदलत राहा. बँकेची, क्रेडिट कार्डची माहिती कोणाला देऊ नका. ईमेलवर पासवर्ड सेव्ह करू नका. तसंच कोणत्याही लॉटरी, भेटवस्तूंच्या फोनकॉल्सवर किंवा ईमेल्सवर विश्वास ठेऊ नका. क्युआर कोड स्कॅन करताना त्यावर संबंधित व्यक्तीचं नावही दिसतं. ते बरोबर असल्याची खात्री करून घ्या. तसंच पेटिएम, भीम अशा प्रचलित अ‍ॅपचाच वापर करा. खात्यातून अचानक पैसे कमी झाले, तर त्याची तक्रार पोलिसांत नोंदवा. लगेच बँकेलाही कळवा. तंत्रज्ञानाचा वापर करताना सतर्क राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अन्यथा फसवणुकीसाठी तुमचाही नंबर लागू शकतो.
    First published:

    Tags: Financial fraud

    पुढील बातम्या