नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : स्वदेशी मोबाईल कंपनी (Mobile Company) लावा इंटरनॅशनलने (Lava International) डिझाईन इन इंडिया अर्थात DII (Design in India) चॅलेंज सुरू केलं आहे. हा DII चा दुसरा सीजन आहे. या सीजनमध्ये कंपनीने लोकांना अपकमिंग लावा फोन डिझाईन (Lava Phone Design) करण्याचं चॅलेंज दिलं आहे.
Design in India चॅलेंजमध्ये विद्यार्थी आणि वर्किंग प्रोफेशनल्सही भाग घेऊ शकतात. ज्यांनी कोणत्याही संस्थेतून डिझाईन प्रोग्राममध्ये बी.टेक, बी.ई बॅचलर्स किंवा डिझाईन प्रोग्राममध्ये मास्टर्स केलं आहे किंवा जे लोक बी.टेक, बी.ई बॅचलर्स किंवा डिझाईन प्रोग्राममध्ये मास्टर्स करत आहेत, ते लोक यात सहभागी होऊ शकतात. या चॅलेंजसाठी रजिस्ट्रेशनची सुरुवात 15 ऑगस्ट 2021 पासून होणार असून 25 ऑगस्ट 2021 पर्यंत रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे.
DII चॅलेंज रजिस्ट्रेशन लावाच्या वेबसाईटवरुन (Lava Website) होईल. टीम लीडरच्या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरद्वारे रजिस्ट्रेशन केलं जाऊ शकतं. विद्यार्थी आणि वर्किंग प्रोफेशनल्स एक टीम म्हणून या चॅलेंजमध्ये सामिल होऊ शकतात. एका टीममध्ये कमीत-कमी एक जण आणि अधिकाधिक 3 लोक भाग घेऊ शकतात. जिंकणाऱ्या तीन टीमला 50,000 रुपये, 25,000 रुपये आणि 15,000 रुपये रोख रक्कम दिली जाईल.
दरम्यान, लावा इंटरनॅशनल दिवाळीआधी आपला पहिला 5G स्मार्टफोन (Lava 5G Smartphone) लाँच करण्याची योजना आखत आहे. या फोनची किंमत 20 हजारहून कमी असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone, Tech news