नवी दिल्ली, 5 डिसेंबर : टेक्नो (Tecno) कंपनीने आपला नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. या फोनमध्ये 6000mAh बॅटरी, 128GB इंटरनल स्टोरेज आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा फोन 9999 रुपयांत आहे. हा फोन सध्या बाजारात असलेल्या पोको M2 आणि रेडमी 9 प्राईमला चांगली टक्कर देणार असल्याचं बोललं जात आहे.
Tecno Pova स्मार्टफोन लाँच झाला आहे. या फोनच्या 4GB64GB वेरिएंटची किंमत 9999 रुपये आहे, तर 6GB128GB वेरिएंटची किंमती 11,999 रुपये आहे. Dazzle Black, Magic Blue आणि Speed Purple अशा तीन रंगात हा फोन उपलब्ध आहे. या tecno pova फोनचा पहिला सेल फ्लिपकार्टवर 11 डिसेंबर, दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे.
4 कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन लेटेस्ट फीचर्ससह लाँच करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे चांगल्या फीचर्ससह असलेल्या या स्मार्टफोनची किंमत 10 हजारहूनही कमी आहे. त्यामुळे बजेट स्मार्टफोनमध्ये चांगला पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध झाला आहे.
फोनला 6.8 इंची एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच अँड्रॉईड 10 बेस्ड HiOS 7.0 आहे. फोनला ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G80 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे.
या फोनला 4 रियर कॅमेरा आहेत. यात 16 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, 2 मेगापिक्सल मॅक्रो, 2 मेगापिक्सल पोर्ट्रेट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये एक डेडिकेटेड AI लेंसही आहे. त्याशिवाय, सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे, ज्यात AI सेल्फी कॅमरा, AI ब्यूटी, नाईट पोर्ट्रेट फीचर मिळतो.
Time to unleash the BEAST, #POVA!
Get ready to experience power and processing speed like never before!
And lots more is in store when you get the POVA 😍
Available at just ₹9,999 on 11th Dec, 12 PM
Check it out on #Flipkart https://t.co/k2kMJTlGrz#unleashthebeast #TECNOPOVA pic.twitter.com/TgVi2bnw6e
— TecnoMobileInd (@TecnoMobileInd) December 4, 2020
फोनला 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. 18W डुअल IC फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनला 4G VoLTE, wifi 802.11 ac, ब्लूटूथ वर्जन 5.0, जीपीएस/एजीपीएस आणि 3.5mm हेडफोन जॅकसारखे फीचर देण्यात आले आहेत.