मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Google Maps दाखवणार आता गर्दीची लाईव्ह माहिती, फूड डिलिव्हरी स्टेटस आणि बरंच काही

Google Maps दाखवणार आता गर्दीची लाईव्ह माहिती, फूड डिलिव्हरी स्टेटस आणि बरंच काही

गुगल मॅप्सच्या (Google Maps) अपडेटेड व्हर्जनमध्ये आता कुठल्या भागात जास्त गर्दी आहे हे तुम्हाला लाईव्ह (REAL TIME) पाहता येणार आहे,  जेणेकरून तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग पाळणं सोपं होईल.

गुगल मॅप्सच्या (Google Maps) अपडेटेड व्हर्जनमध्ये आता कुठल्या भागात जास्त गर्दी आहे हे तुम्हाला लाईव्ह (REAL TIME) पाहता येणार आहे, जेणेकरून तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग पाळणं सोपं होईल.

गुगल मॅप्सच्या (Google Maps) अपडेटेड व्हर्जनमध्ये आता कुठल्या भागात जास्त गर्दी आहे हे तुम्हाला लाईव्ह (REAL TIME) पाहता येणार आहे, जेणेकरून तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग पाळणं सोपं होईल.

  • Published by:  Janhavi Bhatkar
मुंबई, 19 नोव्हेंबर: गुगल मॅप्सने (Google Maps) अँड्रॉइड (Android) आणि आयओएससाठी (iOS) अनेक नवीन अपडेटची घोषणा केली आहे. तसेच आता सर्व जगभरात हाहाकार माजवलेल्या COVID-19  महामारीमुळे गुगल मॅप्सने यासंबंधित एक नवीन अपडेटेड सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल मॅप्सच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये आता कुठल्या भागात जास्त गर्दी आहे हे तुम्हाला लाईव्ह (REAL TIME) पाहता येणार आहे,  जेणेकरून तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग पाळणं सोपं होईल. त्याचबरोबर त्या भागातील कोरोनाग्रस्तांची संख्या, कोरोनासंबंधी मदतीसाठी स्थानिक सेवांचा संपर्क हेही अपवर उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे भारत, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि अमेरिका याठिकाणी टेक आऊट आणि डिलिव्हरी स्टेटससुद्धा दाखवलं जाणार आहे. जेव्हा वापरकर्ते ॲपवरून बुकिंग करतील किंवा ऑर्डर करतील तेव्हा हे फीचर काम करेल. तसंच गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, ही सर्व नवीन फीचर्स आता हळूहळू उपलब्ध होत आहेत. सध्या मर्यादित वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असल्याचं दिसून येत आहे. येत्या काही दिवसात सर्वांना हे फीचर्स वापरता येतील अशी अपेक्षा आहे. (हे वाचा-Samsung Galaxy S21सीरिजच्या फोन्सचे फिचर्स लीक; 5,000mAhची बॅटरी आणि बरंच काही) कोविड लेअर अपडेटेड गुगल मॅप्स वापरायला सोपं आहे आणि नव्या भागात जाताना ग्राहकांना मदत करणार आहे.  कारण की हे फीचर कुठल्या भागात गर्दी आहे याची माहिती आपल्याला आधीच देणार आहे. त्यामुळे आपण त्या भागात जाणे टाळू शकतो. मॅप्सवरील सर्चबारच्या अगदी खाली असलेलं लेअर्स बटण दाबलं की ग्राहकांना COVID-19 Info ऑप्शनला सिलेक्ट करून हे फीचर वापरता येणार आहे. जगभरातील अँड्रॉइड आणि आयओएस वर गुगल मॅप्सचे युजर्स मोबाइल डेटाचा वापर करून आपल्या आजूबाजूला कुठल्या बस, ट्रेन आणि मेट्रोमध्ये गर्दी आहे किंवा कुठल्या भागात गर्दी आहे याची रियल टाइम माहिती (डाटा उपलब्ध असेल तेव्हा) आता मिळवू शकतात असं कंपनीने म्हटलं आहे. या ऑक्टोबरमध्ये गुगल मॅपने एक नवं फीचर दिलं होतं. मॅपमध्ये राखाडी रंगात तुम्ही COVID-19 कंटेनमेंट झोन दिसत होते. यामुळे अनेकांना याचा खूप फायदा झाला. (हे वाचा-फोनच्या डिस्प्लेचा आकार हवा तसा बदला! Samsung लाँच करणार स्ट्रेचेबल स्मार्टफोन) गर्दीची माहिती देण्याव्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचे फीचर म्हणजे तुम्हाला तुमचे टेक आऊट आणि डिलिव्हरी ऑर्डर्सचे स्टेटस गुगल मॅप्समध्ये दिसणार आहे. गुगल मॅप्समधून युजर्स त्यांना डिलिव्हरीसाठी किती वाट पाहावी लागेल किंवा डिलिव्हरी फी किती असेल याची माहिती सुद्धा घेऊ शकणार आहे. मॅप्सवरून तुम्ही रिऑर्डर करू शकणार आहात. तुमच्या ऑर्डरचं स्टेटस बघण्याची ही सुविधा 70 देशांत उपलब्ध असल्याचं गुगलने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. याव्यतिरिक्त गुगल असिस्टंट ड्रायविंग मोड हेसुद्धा मॅप्स मध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. हे फीचर फक्त युएसमधील युजर्ससाठी उपलब्ध आहे. कंपनीने हे फीचर भारतात कधी उपलब्ध होणार आहे याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही.  सिस्टंट ड्रायविंग मोड हे युजर्सना त्यांचा स्मार्टफोन कंट्रोल करण्यास तसेच कॉल उचलण्यात किंवा गाणं बदलण्यास गुगल मॅप द्वारे मदत करतो. त्यामुळे युजर्सना गाडी चालवताना कुठलेही अडथळे येत नाहीत. या सर्व नवीन फीचर्समुळे आता गुगल मॅप्सचा वापर करतांना खूप गोष्टी अधिकच सोप्या प्रकारे वापरता येणार आहेत.
First published:

Tags: Google

पुढील बातम्या