नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर : E-Commerce Websites वर फेस्टिव्ह सीजन काळात वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती, ऑफर्स, कॅशबॅक (Cashbacks), नो कॉस्ट ईएमआय (No Cost EMI) सुविधा दिल्या जातात. सध्या Amazon चा Great Indian Festival आणि Flipkart चा Big Billion Days Sale सुरू आहेत. त्यामुळे ग्राहकांना खरेदीची पर्वणीच आहे. या सेलमध्ये सर्वांत जास्त विकल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजे स्मार्टफोन्स ठरतात. वेगवेगळ्या कंपन्यांचे, वेगवेगळ्या फीचर्ससह स्मार्टफोन्स या सेलमध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे नेमका कोणता फोन घ्यावा, कोणता नको अशी परिस्थिती निर्माण होते. तसंच कोणत्या फोनमध्ये कोणते फीचर्स आहेत, लेटेस्ट फोन कोणता याची माहिती नसल्याने गोंधळ उडतो. जाणून घ्या या सेलमधील जबरदस्त फीचर्ससह काही लेटेस्ट स्मार्टफोन -
Oppo A74 5G -
Oppo कंपनीचा हा स्मार्टफोन कंपनीने भारतात याच वर्षी लाँच केला होता. या सेलमध्ये हा फोन 14,490 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. त्यात एचडीएफसी बँकेच्या ऑफरचाही समावेश आहे. या फोनला 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज आहे. 5000 mAh क्षमतेची बॅटरी या फोनला असून, 18 वॅट फास्ट चार्जरही सोबत दिला जातो. या फोनला 6.49 इंची फुल HD+ पंच होल डिस्प्ले देण्यात आला असून, त्याचं रिझॉल्युशन 2400×1080 पिक्सल्स असतं. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या फोनला साइड फिंगरप्रिंट स्कॅनरही देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनेलवर 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असून, 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे.
Samsung Galaxy M32-5G -
Samsung कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी सीरिजमधला हा फोन ऑगस्ट महिन्यात भारतात लाँच केला होता. हा 5G 12 बँडसह असून, अॅमेझॉनवर बेस्ट ऑफरअंतर्गत तो 14,499 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. या फोनला मीडियाटेक 720 डायमेंसिटी प्रोसेसर असून, हा प्रोसेसर असलेला तो भारतातला पहिला फोन आहे. या फोनला 6.5 इंची टीएफटी डिस्प्ले असून, 5000 mAhची बॅटरी आहे. या फोनला क्वाड कॅमरा सेटअप असून, त्यात प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे. फ्रंट कॅमेरा 13 मेगापिक्सेलला आहे. या फोनमध्ये 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज आहे.
Redmi Note Pro Max -
Xiaomi कंपनीच्या रेडमी ब्रँडने मार्च 2021 मध्ये रेडमी नोट 10 सीरिज लाँच केली होती. या सीरिजअंतर्गत कंपनीने रेडमी नोट 10 प्रो मॅक्स हे टॉप एंड वेरिएंटही लाँच केलं होतं. त्यात 108 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. अलीकडेच रेडमीने आपल्या स्मार्टफोनच्या किमतींमध्ये घट केली होती. या फोनमध्ये 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज आहे. वेबसाइटवर सेलमध्ये हा फोन18,999 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. एचडीएफसी बँक ऑफरअंतर्गत हा फोन 17,499 रुपयांत खरेदी करता येईल. या फोनमध्ये 5020mAh क्षमतेची बॅटरी आहे.
Redmi 9 Active -
हा फोन अॅमेझॉनवरून बेस्ट ऑफरअंतर्गत केवळ 9,499 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. रेडमीचा हा फोन गेल्या महिन्यातच लाँच झाला होता. या फोनला 6.53 इंची HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यावर दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते. या फोनला हेलियो G35 ऑक्टाकोअर प्रोसेसर देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amazon, Flipkart, Smartphone