मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

7 सेकंदात रॉकेट होईल KTM ची कार! या किंमतीला झाली लॉन्च

7 सेकंदात रॉकेट होईल KTM ची कार! या किंमतीला झाली लॉन्च

KTM Car

KTM Car

बाजारात विविध कंपन्यांच्या खास फीचर्स असलेल्या स्पोर्ट्स बाइक (Sports Bike) उपलब्ध आहेत. तरुण रायडर्सची अशा बाइकला विशेष पसंती असते. केटीएम कंपनी (KTM Company) वैशिष्टयपूर्ण फीचर्स असलेल्या स्पोर्ट्स बाइकच्या उत्पादनासाठी भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 16 सप्टेंबर : बाजारात विविध कंपन्यांच्या खास फीचर्स असलेल्या स्पोर्ट्स बाइक (Sports Bike) उपलब्ध आहेत. तरुण रायडर्सची अशा बाइकला विशेष पसंती असते. केटीएम कंपनी (KTM Company) वैशिष्टयपूर्ण फीचर्स असलेल्या स्पोर्ट्स बाइकच्या उत्पादनासाठी भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे. या कंपनीच्या स्पोर्ट्स बाइक मॉडेल्सला तरुणाईकडून विशेष पसंती मिळताना दिसते. सध्या केटीएम एका खास उत्पादनामुळे चर्चेत आहे. या कंपनीनं एक रोड-लीगल सुपर कार (Road Legal Supercar) लॉंच केली आहे. ही कार अतिवेगवान आहे. खास फीचर्स असलेल्या या कारची किंमत जवळपास सव्वा दोन कोटी रुपये आहे. कारचा लूक (Look) अत्यंत आकर्षक आहे. कारमधली फीचर्स आणि तिचा लूक बघता कारप्रेमींची या मॉडेलला पसंती मिळणार याबाबत शंकाच नाही.

ऑस्ट्रेलियन कंपनी केटीएम ही खरं तर जगभरात स्पोर्ट्स बाइकसाठी ओळखली जाते. या कंपनीनं नुकतीच एक रोड-लीगल सुपर कार लॉंच केली आहे. X-Bow GT-XR असं या मॉडेलचं नाव आहे. केटीएम कंपनी X-Bow GT-XR चं 100 युनिट उत्पादित करणार असून, प्रत्येक मॉडेलची किंमत 2, 84, 700 डॉलर म्हणजेच सुमारे 2.26 कोटी रुपये आहे. या किमतीत टॅक्सचा (Tax) समावेश नाही.

फीचर्सचा विचार करता, केटीएमची X-Bow GT-XR ही सुपर कार 0 ते 100 किमी/प्रतितास फक्त 3.4 सेकंदात आणि 100 ते 200 किमी/प्रतितास एवढा वेग 6.9 सेकंदात घेऊ शकते. या कारचा टॉप स्पीड (Top Speed) 280 किमी प्रतितास आहे. या कारमध्ये Audi चं 2.5 लिटर 5 सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 500 bhp असून ते 581Nm पॉवर जनरेट करतं. यामुळे कारचे पुढील बाजूपासून मागील बाजूपर्यंत 44:56 वजन वितरित होतं. कूलिंग सिस्टिमसाठी एक मोठा रेडिएटर कारमध्ये लावण्यात आला आहे. तसंच उजवीकडे टर्बो इंटरकूलर आहे. यात 160 लिटरची लगेज स्पेस आणि 95 लिटरचा फ्युएल टॅंक आहे.

X-Bow GT-XR या सुपर कारला डबल सीटर कार्बन फायबर मोनोकॉक चॅसिज आहेत. यात कार्बन फायबर बॉडी आणि अ‍ॅल्युमिनियम फ्रेम मिळते. या कारचं दार अत्यंत वैशिष्टपूर्ण असून, ते फायटर प्लेनच्या (Fighter Plane) दाराप्रमाणे वरच्या बाजूला उघडतं. या कारमध्ये एकच दार असून ते हायड्रॉलिक यंत्रणेच्या मदतीने उघडतं. इंजिनचा वरचा भाग दुसऱ्या बाजूला वरच्या बाजूस उघडतो. X-Bow GT-XR या सुपर कारचं एकूण वजन 1130 किलोग्रॅम आहे. आतापर्यंत केटीएम कंपनी रेस ट्रॅक फोकस्ड मशीन (Race Track Focused Machine) तयार करण्यासाठी ओळखली जात होती. पण X-Bow GT-XR या रोड-लीगल सुपर कारमुळे कंपनीला नवी ओळख मिळणार आहे. या कारची एकूण वैशिष्ट्यं पाहता ती ग्राहकांना नक्कीच आकर्षित करेल अशी आशा करूया.

First published: