मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

हॅकर्सपासून असा करा बचाव; अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी जाणून घ्या काही सोप्या टिप्स

हॅकर्सपासून असा करा बचाव; अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी जाणून घ्या काही सोप्या टिप्स

जर अकाउंट चुकीच्या हातात गेलं, तर युजरचं बँक अकाउंट खाली होण्याचा धोका असतो, प्रायव्हसी चोरी होऊ शकते. ऑनलाईन प्रोफाईल, पासवर्ड सिक्योर करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 12 मार्च : सध्या इंटरनेटचा वाढता वापर आणि दररोजच्या जीवनात इंटरनेटवर असेलली निर्भरता एकीकडे आपलं जीवन सोपं करत आहे, तर दुसरीकडे व्हर्च्युअल जगासाठी गंभीर धोकाही निर्माण करत आहे. तुमची प्रत्येक ऑनलाईन अ‍ॅक्शन जसं बिल पेमेंट, ग्रॉसरी शॉपिंग किंवा सोशल मीडिया प्रोफाईल सर्वांसाठी वेगवेगळं अकाउंट असतं आणि हे सर्व अकाउंट पासवर्डने प्रोटेक्टेड असतात. जर अकाउंट चुकीच्या हातात गेलं, तर युजरचं बँक अकाउंट खाली होण्याचा धोका असतो, प्रायव्हसी चोरी होऊ शकते. ऑनलाईन प्रोफाईल, पासवर्ड सिक्योर करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

अनेक जण पासवर्ड ठेवताना गोंधळून जातात. त्यासाठी आजकाल अनेक पासवर्ड मॅनेजर आहेत. अनेकदा ऑनलाईन सर्विसेजचा वापर करताना पासवर्ड सजेस्ट केला जातो आणि त्यासह त्याला सेव्ह करण्याचाही ऑप्शन सेम ब्राउजरमध्ये दिला जातो आणि लॉगइनवेळी ऑटोमेटिक तुमचा पासवर्ड ऑटोफिल होतो. इथूनच पासवर्ड मॅनेजरचा कन्सेप्ट येतो.

मार्केटमध्ये काही LastPass, 1Password आणि Dashlane असे पासवर्ड मॅनेजर उपलब्ध आहेत. हे पासवर्ड मॅनेजर फ्री आणि प्रीमियम वर्जनसाठी उपलब्ध आहेत. हे तुमच्या ऑनलाईन प्रोफाईल, ट्रान्झक्शन आणि प्रायव्हसीला हॅकर्सपासून सुरक्षित ठेवतात.

(वाचा - Facebookसाठी वापरा या सेफ्टी टिप्स,असं करा आपलं अकाउंट सुरक्षित)

टू स्टेप वेरिफिकेश - पासवर्ड बनवताना त्यात टू स्टेप वेरिफिकेशनचा वापर करणं गरजेचं आहे. टू स्टेप वेरिफिकेशनमध्ये पासवर्ड टाकल्यानंतर, दुसऱ्या डिव्हाईसवर लिंक किंवा कोडद्वारे त्याला वॅलिडेट करावं लागतं.

नेहमी मोठे पासवर्ड करा - छोटे पासवर्ड क्रॅक करणं किंवा चोरणं हॅकर्ससाठी अतिशय सोपं ठरतं. नेहमी मोठे पासवर्ड ठेवा किंवा पासफ्रेजचा वापर करा. जसं 'Raccoon Doorknob Spacecraft'. असा पासवर्ड चोरणं, हॅक करणं अतिशय कठिण ठरतं.

(वाचा - Google Chrome ब्राउझरला आता आणखी कडक सिक्योरिटी; युजर्सला असा होणार फायदा)

यूनिक पासवर्ड - एका अकाउंटसाठी वापरलेला पासवर्ड नंतर पुन्हा दुसऱ्या अकाउंटसाठी वापरु नका. प्रत्येक वेळी नवीन पासवर्ड सेट करा.

बॅकअप - नेहमी बॅकअप पासवर्डसाठी बॅकअप प्लॅन करा. टू स्टेप वेरिफिकेशनसह ठेवलेला पासवर्ड विसरल्यास, आपल्या पासवर्ड मॅनेजरच्या मास्टर पासवर्डचा बॅकअप आवश्यक करा.

First published:

Tags: Password