मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Whatsup Update: डिलीट झालेले मेसेजेस आणि चॅट्स परत कसे मिळवाल?

Whatsup Update: डिलीट झालेले मेसेजेस आणि चॅट्स परत कसे मिळवाल?

Whatsapp Update:  तुमचा फोन अचानक खराब झाला किंवा तुमच्याकडून चुकून तुमचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस डिलीट झाले तर आता गोंधळून जाण्याची काहीच गरज नाही. काही सोप्या मार्गांनी तुम्ही तुमचे मेसेजेस पुन्हा मिळवू शकता.

Whatsapp Update: तुमचा फोन अचानक खराब झाला किंवा तुमच्याकडून चुकून तुमचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस डिलीट झाले तर आता गोंधळून जाण्याची काहीच गरज नाही. काही सोप्या मार्गांनी तुम्ही तुमचे मेसेजेस पुन्हा मिळवू शकता.

Whatsapp Update: तुमचा फोन अचानक खराब झाला किंवा तुमच्याकडून चुकून तुमचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस डिलीट झाले तर आता गोंधळून जाण्याची काहीच गरज नाही. काही सोप्या मार्गांनी तुम्ही तुमचे मेसेजेस पुन्हा मिळवू शकता.

नवी दिल्ली, 9 मार्च: व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) हा आता आपल्यापैकी बहुतेकांच्या रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे. चॅटिंगपासून बँकिंगपर्यंत आणि मीटिंगपासून चर्चेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची कामं आपण व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून करत असतो. संदर्भासाठी उपयोगी पडतील म्हणून काही आवश्यक चॅट्स आपण कधीच डिलीट करत नाही; पण एखाद्या दिवशी अचानक आपल्याकडून व्हॉट्सअ‍ॅप चॅट डिलीट होतं किंवा फोनमध्ये काही तरी बिघाड झाल्यामुळे ते डिलीट झाल्याचं आपल्या लक्षात येतं. (How to restore deleted chats on whatsapp) हे चॅट्स परत कसे मिळवायचे?

फोन बिघडला किंवा अचानक काही कारणाने चॅट्स डिलीट झाले तर त्यामुळे आपण एकदम हडबडून जातो; पण तसं हडबडून जाण्याची काही गरज नाही. काही डिलीट झालेली चॅट्स पुन्हा मिळवण्याचे काही पर्याय आपल्याकडे आहेत. त्यांचा अवलंब केल्यास चॅट्स पुन्हा मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. त्यामुळे तो प्रयत्न तरी करून पाहायला हरकत नाही. डिलीट झालेली व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स (How to recover deleted WhatsApp Chats) परत मिळवण्याची काही तंत्रं इथे तुम्हाला सांगत आहोत. 'डिजिट'वर त्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅपमधून चॅट्स डिलीट झाली, तरी ती आयफोन असेल तर आयक्लाउड आणि अँड्रॉइड असेल तर गुगल ड्राइव्हवर सेव्ह असतात. त्यामुळे चॅट फोनमधून डिलीट झाल्यास ती पुन्हा मिळवता येऊ शकतात. अर्थात, अशी वेळ कधी आलीच तर चॅट पुन्हा मिळवण्यासाठी सर्वांत महत्त्वाचं आहे ते म्हणजे व्हॉट्सअॅप बॅकअप हा पर्याय तुम्ही (ON) सुरू ठेवलेला असायला हवा. तो कायम ऑन असेल तरच तुम्हाला चॅट्स परत मिळू शकतात. त्यामुळे आत्ता लगेच तुम्ही व्हॉट्सअॅप चेक करा आणि तो पर्याय ऑन असल्याची खात्री करा.

क्लाउड बॅकअपमधून चॅट्स परत मिळवणं:

- चॅट फोनमधून डिलीट झाली आहेत, असं लक्षात आलं, तर पहिल्यांदा तुमच्या अँड्रॉइड किंवा आयफोनवरून व्हॉट्सअॅप अनइनस्टॉल करावं.

- त्यानंतर व्हॉट्सअॅप पुन्हा इन्स्टॉल करावं. त्यासाठी तुमचा मोबाइल नंबर टाकावा.

- सेटअप झाल्यानंतर तुम्हाला क्लाउड बॅकअपमधून मेसेजेस रिस्टोअर करण्यासाठीचा मेसेज दिसेल.

- अँड्रॉइड फोनवर गुगल ड्राइव्हवरून (Google Drive) रिस्टोअर करण्यास सांगितलं जाईल, तर आयफोनवर आयक्लाउडवरून (iCloud) रिस्टोअर करण्यास सांगितलं जाईल.

- तो पर्याय स्वीकारल्यानंतर थोड्याच वेळात तुमच्या व्हॉट्सअॅपवरची सगळी चॅट्स पुन्हा फोनवर दाखल होतील.

- अर्थात, एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी, की रिस्टोअरचा पर्याय उपलब्ध झालेला असताना तो पर्याय स्वीकारला नाही, तर मात्र तुमची चॅट्स परत मिळत नाहीत.

  हे वाचा -   5G सारखा होईल तुमच्या 4G इंटरनेटचा स्पीड; फोनमध्ये करा हे बदल

लोकल बॅकअपमधून चॅट्स परत मिळवणं:

- यासाठी तुमच्या फोनमधल्या फाइल मॅनेजर अॅपवर (File Manager App) जावं. (ते अॅप नसेल, तर गुगलचं फाइल्स हे अॅपही घेऊ शकता.)

- त्यातून व्हॉट्सअॅप फोल्डरवर जावं.

- त्यातील डेटाबेस (Database) हा फोल्डर निवडावा. त्यात व्हॉट्सअॅपच्या बॅकअप फाइल्स साठवलेल्या असतात.

- त्यातील msgstore.db.crypt12 ही फाइल निवडा. त्या फाइलचं नाव बदलायचं आहे. त्यासाठी Rename हा पर्याय निवडून msgstore_BACKUP.db.crypt12 असं नाव त्या फाइलला द्या.

- ही तुमची सगळ्यात ताजी बॅकअप फाइल असेल. त्या फाइलवर त्याच नावाची दुसरी फाइल ओव्हरराइट होऊ नये म्हणून ती रीनेम करायची असते.

- आता तुम्हाला त्या फोलडरमध्ये अनेक फाइल्स दिसतील. त्या फाइल्सची नावं msgstore-YYYY-MM-DD.1.db.crypt12 अशा फॉरमॅटमध्ये असतील.

- हे तुमचे जुने व्हॉट्सअॅप बॅकअप्स आहेत. त्यापैकी सर्वांत ताजा बॅकअप निवडून msgstore.db.crypt12 असं नाव देऊन ती फाइल रीनेम करावी.

- त्यानंतर तुम्हाला गुगल ड्राइव्ह ओपन करून हॅम्बर्गर आयकॉन म्हणजे तीन उभ्या रेषांच्या आयकॉनवर क्लिक करावं लागेल.

- त्यात तुम्हाला Backups सापडेल.

- त्यातून व्हॉट्सअॅप बॅकअप डिलीट करावा.

- त्यानंतर व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करावं.

- अॅप सेट केल्यानंतर चॅट लोकल बॅकअपवरून रिस्टोअर करण्याचा पर्याय येतो.

- त्यातून रिस्टोअर (Restore) हा पर्याय निवडल्यावर तुम्हाला डिलीट झालेले व्हॉट्सअॅप मेसेजेस परत मिळतील.

First published:

Tags: Tech news, Technology, Whatsaap, Whatsapp chat, Whatsapp New Feature