मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

मोफत लंच, कॅफेटेरिया, रूफटॉप सनबाथ आणि आलिशान वर्कप्लेस, Twitter चं मुख्यालय पाहुन तुमचेही डोळे फिरतील

Twitter Head Quarter : भारतीय पराग अग्रवाल (Parag Agrawal) मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरचे नवे सीईओ बनले आहेत. 15 वर्षांपूर्वी 4 मित्रांनी मिळून या कंपनीची स्थापना केली होती. सॅन फ्रान्सिस्को (San Francisco) येथे असलेले त्याचे भव्य मुख्यालय कसे आहे हे तुम्हाला माहीत आहे का? डिझायनिंग आणि इंटेरिअरच्या बाबतीत तर हे कार्यालय अप्रतिम आहेच. पण कंपनीतील अशा अनेक सुविधा आहेत, ज्या वाचून तुम्ही म्हणताल आम्हालाही इथं काम करायचंय.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

अमेरिकेचे महानगर सॅन फ्रान्सिस्कोमधील ही प्रतिष्ठित आर्ट डेको इमारत ट्विटरचे (Twitter) मुख्यालय आहे. या इमारतीच्या अनेक मजल्यांवर याची कार्यालये आहेत. जगभरातील ट्विटरच काम याच ठिकाणावरुन नियंत्रित केलं जातं. या ठिकाणी नवनवीन संशोधन होते आणि ट्विटरवरील प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवलं जातं. ट्विटरचे हे कार्यालय अशा आधुनिक कार्यालयांसारखे आहे, जिथे कर्मचाऱ्यांसाठी आराम आणि कामासाठी अनुकूल जागा आहे.

खरंतर ट्विटरची सुरुवात 21 मार्च 2006 रोजी झाली होती. मात्र, कालांतराने कंपनी वाढू लागली. त्यानंतर 2012 मध्ये या सोशल साइटचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को येथे आणण्यात आलं. या इमारतीचे अनेक मजले भाड्याने घेऊन त्यांची पुनर्रचना करण्यात आली आहे.

जेव्हा ट्विटरचे जागतिक मुख्यालय इथं आलं तेव्हा हे ठिकाण सॅन फ्रान्सिस्कोमधील एक सामान्य ठिकाण होतं. मात्र, ट्विटरच्या आगमनानंतर याची ओळख बदलली. हे आता सॅन फ्रान्सिस्कोच्या मुख्य ठिकाणापैकी एक म्हणून ओळखलं जातं.

हे ट्विटर मुख्यालयाचे ठिकाण आहे, जिथे त्याच्या कार्यालयातील तीन कॅफेटेरियापैकी एक बनवले आहे, जिथे कर्मचारी आरामात बसून खाणे, कॉफी किंवा स्नॅक्स इत्यादी घेतात. जिथं भिंतीवर निळा पक्षी दिसेल, जो ट्विटरचा लोगो आहे. दुसऱ्या बाजूला कॉन्फरन्स रूम आणि केबिन किंवा बसण्याची जागा आहे.

ट्विटर कार्यालयाच्या आतील भागात लोकल आणि वर्ल्ड क्लास टच आहे. हे अशा प्रकारे तयार करण्यात आलंय की कर्मचारी कुठेही बसून काम करत असला तरी त्यांना आराम वाटेल. रंगाची निवड ट्विटरच्या रंगावरुनच केलेली दिसते.

ट्विटरचे मुख्यालय दोन इमारतींना जोडून तयार करण्यात आलं आहे. यातील एक बिल्डिंग 1937 ची आर्ट डेको बिल्डिंग आहे तर दुसरी 1970 च्या दशकातील आहे. आफिस दोन्ही इमारतींचा वापर करते. कार्यालयात तुम्हाला नैसर्गिक वातावरण देण्यासाठी ठिकाणी इनडोअर प्लांट आहेत.

ट्विटरनेच हॅशटॅगचा प्रभावी वापर सुरू केल्यामुळे, संपूर्ण कार्यालयात हॅशटॅग देऊन अनेक स्लोगन आणि कार्यालयाच्या ठिकाणांची नावे लिहिली आहेत. ऑफिसमध्ये सर्वत्र कॉफीची व्यवस्था आहे. पण बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी ट्विटर कॅफेटेरिया बनवण्यात आला आहे, ज्यामध्ये ते आरामात बसून बराच वेळ घालवू शकतात. प्रत्येक मजल्यावर कर्मचाऱ्यांना आरामात बसता येईल अशी जागा देण्यात आली आहे. ज्यामध्ये ते आरामात बसू शकतात. चर्चा करू शकतात. वास्तविक, ट्विटरने या इमारतीचे अनेक मजले घेतल्यानंतर, त्यानुसार संपूर्ण डिझाइन बदलण्यात आले.

ट्विटरवर हा आणखी एक मोठा कॅफेटेरिया आहे. हा आकारने खूप मोठा आहे, इथं मोठ्या संख्येने लोक एकत्र बसू शकतात. महत्वाचं म्हणजे Twitter मुख्यालय आपल्या कर्मचार्‍यांना मोफत जेवणाची सुविधा प्रदान करते, ज्यामध्ये पिझ्झा, सॅलड, ताजी फळे आणि चिकन इत्यादींचा समावेश आहे. या खाद्यपदार्थांना खंडीय विविधतेचा स्थानिक स्पर्श आहे. खानपान विभाग सांभाळणाऱ्यांची टीमही चांगली आहे.

कर्मचाऱ्यांना कामाच्या दरम्यान कंटाळा आला किंवा त्यांना झोपायचे असेल किंवा सूर्यप्रकाशात बसायचे असेल तर टेरेसवर हिरवळीत सनबाथचीही व्यवस्था आहे. ते त्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकतात. कर्मचारी छतावरील सोफ्यावर किंवा आरामदायी खुर्च्यांवर बसूनही काम करू शकतात.

जरी ट्विटरचे जगभरात 5500 हून अधिक कर्मचारी आहेत आणि सर्व कार्यालये जगभरात पसरलेली आहेत. परंतु, या मुख्यालयाच्या इमारतीत 2500 कर्मचारी काम करतात. यामध्ये निम्मे अभियंते आहेत, तर उर्वरित कंपनीची इतर कामे पाहतात. ज्यामध्ये सेल्स ते एच.आर. तसे, आजकाल बरेच कर्मचारी रिमोटवर्क काम करत आहेत.

कर्मचार्‍यांना कामाच्या दरम्यान खेळण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी पुरेशी व्यवस्था आहे, जेणेकरून ते स्वत: ला फ्रेश ठेवू शकतील. कर्मचाऱ्यांना या कार्यालयात मुलांना आणण्याची मुभा असली तरी, मुलांना सोडण्यासाठी स्वतंत्र जागा आहे. लहान मुलांसाठी योगासनांचे कार्यक्रम सुरू आहेत.

First published:

Tags: Twitter