Elec-widget

'विसरण्याचा अधिकार' माहितीय का? जाणून घ्या कोणाला होऊ शकतो फायदा

'विसरण्याचा अधिकार' माहितीय का? जाणून घ्या कोणाला होऊ शकतो फायदा

राइट टू प्रायव्हसी, राइट टू एज्युकेशन, राइट टू इन्फर्मेशन असे अनेक अधिकार तुम्हाला माहिती असतील पण राइट टू बी फरगॉटन असा विसरण्याचाही काही अधिकार आहे याबद्दल माहिती आहे का?

  • Share this:

मुंबई, 03 ऑक्टोबर : राइट टू प्रायव्हसी, राइट टू एज्युकेशन, राइट टू इन्फर्मेशन असे अनेक अधिकार तुम्हाला माहिती असतील पण राइट टू बी फरगॉटन असा विसरण्याचाही काही अधिकार आहे याबद्दल माहिती आहे का? विसरण्याचा अधिकार म्हणजेच Right to be Forgotten हा एक ऑनलाइन प्रायव्हसी लॉ आहे.

Right to be Forgotten मुळे कोणत्याही एखाद्या संस्थेला तुमची वैयक्तिक माहिती काढून टाकण्यास सांगता येते. तुम्ही जर असं एखाद्या संस्थेला सांगितलंत तर त्यांच्याजवळ असलेली तुमची माहिती काढून टाकावी लागते. युरोपीय महासंघाच्या जनरन डाटा प्रोटेक्शन रेग्युलेशननुसार हा अधिकार लोकांना मिळाला आहे.

जीडीपीआरच्या वेबसाइटनुसार, विसरण्याच्या या अधिकाराबद्दल कलम 17 मध्ये सविस्तर सांगण्यात आलं आहे. डाटा ज्याच्याबद्दल आहे त्याच्याकडे हा अधिकार आहे की डाटावर नियंत्रण असलेल्यांना तो काढून टाकण्यास सांगू शकतो. त्यानंतर डाटा ज्याच्या ताब्यात आहे त्याला तात्काळ डाटा मिटवावा लागतो. तात्काळ म्हणजे जवळपास एक महिन्याचा कालावधी यासाठी देण्यात आला आहे.

गुगल सारख्या सर्च इंजिन कंपनीकडे या अधिकारांतर्गत कोणी तक्रार करतं तेव्हा त्याची चौकशी केली जाते. तपासणी केल्यानंतर संबंधित माहिती हटवण्यात येते. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, हा कायदा झाल्यानंतर गुगलकडे जवळपास 8.45 लाख तक्रारी आल्या. त्यात एकूण 33 लाख लिंक हटवण्याची विनंती करण्यात आली.

युरोपीय महासंघाच्या सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी एक निर्णय घेण्यात आला. यात फ्रान्सच्या एका संस्थेने आरोप केला होता की गूगलने त्यांच्या सांगण्यावरून ग्लोबल डाटाबेसवरून त्यांची माहिती काढून टाकली नाही. न्यायालयानं हा आरोप फेटाळून लावत गुगलच्या बाजूने निर्णय दिला.

Loading...

न्यायालयानं गुगलच्या बाजूने हा निर्णय देण्याचं कारणं देतानं सांगितलं की, जीडीपीआर अंतर्गत विसरण्याचा अधिकार युरोपीय महासंघातील देशांना आहे. त्याच्या बाहेरील देश आणि लोकांसाठी लागू नाही. यानुसार भारतातील लोकही या अधिकाराचा लाभ घेऊ शकत नाहीत.

एकनाथ खडसेंबद्दल शरद पवारांनी केला गौप्यस्फोट, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: technology
First Published: Oct 4, 2019 06:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...