मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Electric Card: साडेचार लाखांची इलेक्ट्रिक कार; पाच रुपयात धावते 60 किमी

Electric Card: साडेचार लाखांची इलेक्ट्रिक कार; पाच रुपयात धावते 60 किमी

केरळच्या कोल्लम जिल्ह्यात राहणाऱ्या अँटोनी जॉन यांनी या कारची निर्मिती केली आहे. त्यांनी आपल्या घरी इलेक्ट्रिक कार डिझाईन केली असून ती तयार करण्यासाठी त्यांना साडेचार लाख रुपये खर्च आला आहे.

केरळच्या कोल्लम जिल्ह्यात राहणाऱ्या अँटोनी जॉन यांनी या कारची निर्मिती केली आहे. त्यांनी आपल्या घरी इलेक्ट्रिक कार डिझाईन केली असून ती तयार करण्यासाठी त्यांना साडेचार लाख रुपये खर्च आला आहे.

केरळच्या कोल्लम जिल्ह्यात राहणाऱ्या अँटोनी जॉन यांनी या कारची निर्मिती केली आहे. त्यांनी आपल्या घरी इलेक्ट्रिक कार डिझाईन केली असून ती तयार करण्यासाठी त्यांना साडेचार लाख रुपये खर्च आला आहे.

    मुंबई, 11 एप्रिल : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या (Petrol Diesel Price Hike) काळात स्वस्तात प्रवास होऊल अशा वाहनांची लोकांना गरज आहे. हीच गरज लक्षात घेऊन केरळमधील एका 67 वर्षीय व्यक्तीने अवघ्या 5 रुपयांत 60 किमीचा प्रवास करणारी इलेक्ट्रिक कार (Electric Car) बनवली आहे. केरळच्या कोल्लम जिल्ह्यात राहणाऱ्या अँटोनी जॉन यांनी या कारची निर्मिती केली आहे. त्यांनी आपल्या घरी इलेक्ट्रिक कार डिझाईन केली असून ती तयार करण्यासाठी त्यांना साडेचार लाख रुपये खर्च आला आहे. या गाडीत 2-3 जण बसू शकतात. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही कार केवळ 5 रुपयांमध्ये 60 किलोमीटर धावू शकते. Village Vartha या मल्याळम भाषेतील यूट्यूब चॅनलने अँटोनी जॉन यांनी डिझाइन केलेल्या कारची स्टोरी शेअर केली आहे. असे सांगण्यात आले आहे की करिअर सल्लागार अँटोनी जॉन यांना त्यांच्या कार्यालयात पोहोचण्यासाठी दररोज 60 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. ऑफिसला जाण्यासाठी ते इलेक्ट्रिक स्कूटर वापरत असे. मात्र कडक ऊन, पाऊस अशा खराब हवामानात त्यांना इलेक्ट्रिक स्कूटरवरून ये-जा करताना त्रास सहन करावा लागला. स्मार्टफोनवर Online अभ्यास करता? Digital Screen चा होतोय धक्कादायक परिणाम - रिपोर्ट Home Made Electric Car, Electric vehicle Sales, Electric vehicle Price in India, Electric Car Price in India, या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अँटोनी जॉन यांनी इलेक्ट्रिक कार बनवण्याचे काम सुरू केले. अँटनी जॉन यांनी इलेक्ट्रिक कार बनवण्यासाठी सर्व माहिती आणि साहित्य गोळा करण्यास सुरुवात केली. या कामासाठी त्यांनी एका गॅरेजशी संपर्कही केला. गॅरेजच्या मेकॅनिक्ससोबत मिळून त्यांनी इलेक्ट्रिक कारची डिझाईन केली आणि मेकॅनिक्ससोबत मिळून कार बनवण्याचे काम सुरू केले. 
केरल के कोल्लम जिले में रहने वाले एंटनी जॉन ने घर पर ही इलेक्ट्रिक कार तैयार की है. (Image- Village Vartha youtube) अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर अँटोनी यांची मेहनत रंगली आणि त्यांची इलेक्ट्रिक कार तयार झाली. या कारमध्ये सामान्य कारप्रमाणे स्टीयरिंग, ब्रेक, क्लच, एक्सीलरेटर, हेडलाइट्स आणि इंडिकेटर यांसारखी सर्व फीचर्स आहेत. ड्रायव्हिंग सीटच्या मागे दोन लोकांसाठी बसण्याची जागा आहे. या कारचा कमाल वेग ताशी 25 किलोमीटर आहे आणि त्यातील बॅटरीची रेंज 60 किलोमीटर आहे. बॅटरी घरीच चार्ज करता येते आणि ती पूर्ण चार्ज होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अँटनी यांनी सांगितले की, ही इलेक्ट्रिक कार बनवण्यासाठी 4.5 लाख रुपये खर्च झाले आहेत. आता ते दुसऱ्या इलेक्ट्रिक वाहनावर काम करत आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Car, Electric vehicles

    पुढील बातम्या