Home /News /technology /

फेल होणार नाही Online Transaction, Google Pay पेमेंटवेळी या गोष्टी लक्षात ठेवाच

फेल होणार नाही Online Transaction, Google Pay पेमेंटवेळी या गोष्टी लक्षात ठेवाच

Google Pay वरुन पेमेंट करताना अनेकदा आपल्या अकाउंटमधून पैसे कट होतात, परंतु समोरच्या व्यक्तीला पैसे पोहोचलेले नसतात. त्यामुळे Online Transaction करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास कोणतीही समस्या येणार नाही.

  नवी दिल्ली, 16 जानेवारी : सध्या ऑनलाइन पेमेंटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. Google Pay वरुन पेमेंट करताना अनेकदा आपल्या अकाउंटमधून पैसे कट होतात, परंतु समोरच्या व्यक्तीला पैसे पोहोचलेले नसतात. अशाप्रकारे ट्रान्झेक्शन फेल होणं ही अतिशय सामान्य बाब आहे. ऑनलाइन पेमेंट करणाऱ्या अनेकांसोबत असं घडतं. त्यामुळे Online Transaction करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास कोणतीही समस्या येणार नाही. ऑनलाइन ट्रान्झेक्शनमध्ये इंटरनेट स्पीडचा मोठा रोल असतो. ट्रान्झेक्शन फेलची अधिकतर प्रकरणं स्लो स्पीड डेटामुळे होतात. इंटरनेट कनेक्शन स्लो असल्यास ट्रान्झेक्शन योग्यरित्या पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे ऑनलाइन पेमेंट करताना आधी मोबाइल डेटा स्पीड तपासणं गरजेचं आहे. इंटरनेट स्पीड कमी असल्यास ट्रान्झेक्शन करू नये.

  हे वाचा - कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे तुमचं Aadhaar Card, घरबसल्या असं तपासा

  Smartphone वरुन एखाद्याच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करत असाल, पेमेंट करत असाल आणि ट्रान्झेक्शन फेल होत असेल, तर लगेच दुसरं ट्रान्झेक्शन करू नका. असं केल्याने दुसरं ट्रान्झेक्शन देखील फेल होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही वेळ वाट पाहणं फायद्याचं ठरतं.

  हे वाचा - UPI Payment करता?UPI PINद्वारे होणाऱ्या फ्रॉडपासून करा बचाव, NPCI ने केलं अलर्ट

  एक ट्रान्झेक्शन झाल्यानंतरच दुसरं पेमेंट करा. ट्रान्झेक्शनसाठी हिरव्या रंगाचं इंडिकेटर दाखवलं जातं. हिरवा रंग सिग्नल असतो, जो ट्रान्झेक्शन करण्यासाठी योग्य वेळ असल्याचं सांगतो. त्यानंतरच ट्रान्झेक्शन करा. QR Code ने ट्रान्झेक्शन करताना QR कोड एकदा स्कॅन केल्यानंतर काही वेळ थांबा, त्यानंतरच पुढील ट्रान्झेक्शन करा. QR कोडने ट्रान्झेक्शन करताना घाई करू नका. यामुळे ट्रान्झेक्शन फेल होऊ शकतं.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Google, Online payments, Tech news, Upi

  पुढील बातम्या