मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

नवीन Fridge विकत घेताना लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा होईल पस्तावा!

नवीन Fridge विकत घेताना लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा होईल पस्तावा!

फ्रीज ही स्वयंपाकघरातली सर्वांत महत्त्वाची वस्तू आहे. जवळपास सर्वच घरांमध्ये फ्रीज असतो. घरातल्या फ्रीजची निवड करण्याआधी कोणत्या गोष्टी ध्यानात (How To Choose A Refrigerator) घ्याव्यात, याविषयी जाणून घेऊ या.

फ्रीज ही स्वयंपाकघरातली सर्वांत महत्त्वाची वस्तू आहे. जवळपास सर्वच घरांमध्ये फ्रीज असतो. घरातल्या फ्रीजची निवड करण्याआधी कोणत्या गोष्टी ध्यानात (How To Choose A Refrigerator) घ्याव्यात, याविषयी जाणून घेऊ या.

फ्रीज ही स्वयंपाकघरातली सर्वांत महत्त्वाची वस्तू आहे. जवळपास सर्वच घरांमध्ये फ्रीज असतो. घरातल्या फ्रीजची निवड करण्याआधी कोणत्या गोष्टी ध्यानात (How To Choose A Refrigerator) घ्याव्यात, याविषयी जाणून घेऊ या.

मुंबई, 11 ऑगस्ट : घर सजवताना महत्त्वाच्या व गरजेच्या वस्तूंची खरेदी आधी करावी लागते. एखादी क्षुल्लक खरेदी करण्यासाठीही अनेक गोष्टींचा विचार आपण करतो. मग घरातल्या महत्त्वाच्या वस्तूची खरेदी करताना तर विचार केलाच पाहिजे. तंत्रज्ञानावर आधारित सर्व उपकरणं/वस्तू सतत अपग्रेड होत असतात. अशा वस्तू घेण्याआधी तुमची गरज व वस्तूची योग्य माहिती जाणून घेतली, तर निवड करणं सोपं होऊ शकतं. घरातल्या फ्रीजची निवड करण्याआधी कोणत्या गोष्टी ध्यानात (How To Choose A Refrigerator) घ्याव्यात, याविषयी जाणून घेऊ या. फ्रीज ही स्वयंपाकघरातली सर्वांत महत्त्वाची वस्तू आहे. जवळपास सर्वच घरांमध्ये फ्रीज असतो. घरातल्या फ्रीजचा वापर भरपूर असल्यानं कधी तो खराब होऊ शकतो, तर कधी जुना झाल्यामुळे बदलण्याची वेळ येते. बाजारात अनेक नवीन प्रकारचे फ्रीज आता उपलब्ध आहेत. यातला आपल्या गरजेनुसार कोणता निवडावा याविषयी संभ्रम होणं साहजिक आहे. फ्रीजची निवड करणं सोपं व्हावं यासाठी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बजेट (Budget) ही असते. फ्रीजसाठी तुम्ही किती पैसे खर्च करू शकता, हे ठरवा. त्याची घरातली गरज किती आहे हे लक्षात घ्या. तसंच फ्रीजसारखी वस्तू सतत चालू ठेवावी लागते. त्यामुळे वीजबिलावरही परिणाम होतो. फ्रीजला लागणाऱ्या विजेच्या युनिट्सबद्दल फ्रीजवरच माहिती दिलेली असते. फ्रीजवर जितके जास्त स्टार असतील, तितकी कमी वीज खर्च होते. त्यामुळे अशाच फ्रीजची निवड करा. खिशाला कात्री लावणाऱ्या या सर्व गोष्टींचा विचार सर्वांत आधी करा. फ्रीजचा आकार तो किती लिटर क्षमतेचा आहे, यावरून ठरतो. पूर्वीसारखे एकच दार असलेले फ्रीज आता कमी असतात. आता फ्रीजचं स्वयंपाकघरातलं काम वाढल्यामुळे त्याची क्षमताही वाढली आहे. कमीत कमी ते जास्तीत जास्त लिटर्सची क्षमता असणाऱ्या फ्रीजचे अनेक पर्याय दुकानात उपलब्ध असतात. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे फ्रीजची लिटर क्षमता (Capacity) आता भरपूर वाढलेली आहे. तुमच्या गरजेनुसार हवा त्या क्षमतेचा फ्रीज तुम्ही निवडू शकता. कुटुंबातल्या सदस्यांची संख्या किती आहे, यावरून फ्रीजची निवड करावी. उदा. कुटुंबात 2 ते 5 सदस्य असतील, तर 263-264 लिटर क्षमतेचा फ्रीज पुरेसा ठरू शकेल. जुना फ्रीज बदलण्याचा विचार असेल, तर आता बाजारात फ्रीजचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. यात सध्या कन्व्हर्टिबल फ्रीज (Convertible Fridge) खूप लोकप्रिय झाले आहेत. यात फ्रीजर व फ्रीज या विभागांना गरजेनुसार एकमेकांमध्ये रूपांतरित करता येतं. फ्रीझरचा वापर जास्त नसेल, तर त्याचाही वापर फ्रीज म्हणून करता येतो. तसंच डीप फ्रीझर मोठा हवा असेल, तर फ्रीजला डीप फ्रीझरमध्ये रूपांतरित करता येतं. हे फ्रीज मल्टिफंक्शन असणारे असतात. फ्रीजचं डिझाइन, रंग यात आता कंपनीनुसार खूप वैविध्य पाहायला मिळतं. फ्रीजची गरज व बजेट या गोष्टींचा विचार पक्का झाल्यावर इतर गोष्टींची माहिती घ्या. म्हणजे नव्या फ्रीजची निवड करणं सोपं होईल.
First published:

पुढील बातम्या