Home /News /technology /

नवी गाडी घ्यायची आहे? या 5 गोष्टी लक्षात ठेवाच; तुमची 'ड्रिम कार' घेताना होईल फायदा

नवी गाडी घ्यायची आहे? या 5 गोष्टी लक्षात ठेवाच; तुमची 'ड्रिम कार' घेताना होईल फायदा

अनेकदा लोक कारची निवड करताना आपलं बजेट आणि कारचं मायलेज पाहतात. अशात कोणती कार घ्यावी - कोणती नाही, कोणती योग्य ठरेल असे अनेक प्रश्न पडतात. तुमची ड्रिम कार खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास, त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 9 सप्टेंबर : जवळपास प्रत्येकाचंच आपली स्वत:ची गाडी असावी असं स्वप्न असतं. त्यामुळे जो कोणी आपली पहिली कार खरेदी करतो, त्याला ड्रिम कारचं म्हटलं जातं. पण तुमची ड्रिम कार खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास, त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. अनेकदा लोक कारची निवड करताना आपलं बजेट आणि कारचं मायलेज पाहतात. अशात कोणती कार घ्यावी - कोणती नाही, कोणती योग्य ठरेल असे अनेक प्रश्न पडतात. भारतात सर्वात स्वस्त कार - कोणतीही कार खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी आपलं बजेट पाहावं. कार घेतल्यानंतर ग्राहकाला सर्वसाधारण खर्च करण्यात अडचणी येऊ नयेत, असं कारचं बजेट असावं. नवी कार खरेदी करताना, कारचं डाउन पेमेंट आणि EMI आपल्या बजेटनुसार असावा, याकडेही लक्ष द्यावं. भारतात सध्या सर्वात स्वस्त कार मारुती अल्टो आहे, ज्याची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत 2.99 लाख रुपयांपासून आहे. गरजेनुसार सेगमेंट निवडा - बाजारात सर्व सेगमेंट्समधील कार उपलब्ध आहेत. तुमच्या गरजेनुसार कार सेगमेंट निवडा. जर तुमची फॅमिली 4 ते 5 लोकांची आहे, आणि बजेट कमी असेल, तर असे ग्राहक अल्टो (Alto), स्विफ्ट (Swift), टाटा टीआगो (Tata Tiago) अशा कार्सची निवड करू शकतात. जर फॅमिली मोठी असेल, तर ग्राहक बजेट वाढवून एसयूव्ही (SUV) किंवा एमपीव्ही (MPV) सारख्या मारुती एर्टिगा (Maruti Ertiga), टोयोटा इनोवा (Toyota Innova), ब्रेजा (Brezza), हुंदाई क्रेटा (Hyundai Creta) अशा कार्सची निवड करू शकतो. ऑनलाईन, डिलर्स, ओळखीच्या लोकांकडून माहिती घ्या - कोणतीही नवी कार खरेदी करताना केवळ कारचा लुक किंवा डिझाईन पाहून खरेदी करू नका. कार घेण्याआधी त्याबाबत माहिती घ्या. जी कार घ्यायची इच्छा आहे, त्याबाबत ऑनलाईन, ओळखीच्या लोकांकडून, डिलर्सकडून माहिती घ्या. कारचा मेंटनेंस खर्च, एक्सेसरीज आणि मायलेजबाबत माहिती घ्या.

  (वाचा - सेकंड हँड कार खरेदी करताय? RC मध्ये हा पॉईंट तपासाच; अन्यथा येईल मोठी समस्या)

  कारचा वापर कमी असल्यास - पेट्रोल कार घ्यावी की डिझेल कार? हा प्रश्नही कार घेताना गोंधळात टाकू शकतो. भारतात आता पेट्रोल आणि डिझेल किंमतीत जास्त अंतर राहिलेलं नाही. काही वर्षांपूर्वी पेट्रोल-डिझेल किंमतीत 25 ते 30 रुपयांचा फरक असायचा. डिझेल कारच्या किंमती पेट्रोल कारच्या तुलनेत अधिक असतात. त्यामुळे मेंटनेंसचा खर्च अधिक येतो. जर तुम्ही कारचा वापर कमी करत असाल, तर पेट्रोल कारची निवड करणं योग्य ठरेल. परंतु जर कार दररोज 70 ते 100 किलोमीटरपर्यंत चालवत असाल, तर डिझेल कार योग्य ठरेल. डिझेल कार्स व्यावसायिक वापरासाठी चांगला पर्याय आहेत.

  (वाचा - वाहनाच्या RCमध्ये नॉमिनीचं नाव जोडण्याची प्रक्रिया सोपी होणार; गाइडलाइन्स जारी)

  टेस्ट ड्राईव्ह - टेस्ट ड्राईव्ह करताना कार हँडलिंग, सस्पेंशन, स्टिअरिंग कमांड, ब्रेकिंग कंट्रोल आणि मायलेजवर पूर्ण लक्ष द्या. कार टेस्ट ड्राईव्ह करताना, चांगल्या आणि खराब अशा दोन्ही रस्त्यांवर चालवून पाहा. ज्यावेळी टेस्ट ड्राईव्हमध्ये पूर्णपणे समाधान मिळेल, त्यावेळीच तुमच्या योग्य ड्रिम कारची निवड करा.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Car

  पुढील बातम्या