Home /News /technology /

Jio चा जबरदस्त प्लॅन, केवळ 2 रुपये अधिक खर्चून मिळेल 365GB डेटा, फ्री कॉलिंग आणि हे फायदे

Jio चा जबरदस्त प्लॅन, केवळ 2 रुपये अधिक खर्चून मिळेल 365GB डेटा, फ्री कॉलिंग आणि हे फायदे

जर तुम्ही Reliance Jio चे Prepaid ग्राहक असाल, तर तुम्ही केवळ 2 रुपये अधिक देऊन 365GB अॅडिशनल डेटा मिळवू शकता.

  नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : सध्या इंटरनेट सर्वांसाठी गरजेचं ठरलं आहे. युजर्सची इंटरनेटची गरज आणि त्याचा वाढता वापर लक्षात घेता, Reliance Jio देशभरात आपल्या युजर्ससाठी आकर्षक प्लॅन लाँच करत असतं. यात डेटासह, फ्री कॉलिंगची सुविधाही मिळते. जर तुम्ही Reliance Jio चे Prepaid ग्राहक असाल, तर तुम्ही केवळ 2 रुपये अधिक देऊन 365GB अॅडिशनल डेटा मिळवू शकता. Reliance Jio चे हे दोन्ही प्लॅन वर्षभर चालतात, जे डेटा लिमीटमध्ये मार्केटमध्ये सर्वाधित चांगले प्लॅन ठरतात. Reliance Jio चा पहिला प्लॅन 2,397 रुपये, तर दुसरा प्लॅन 2,399 रुपये आहे. 2,397 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला 365GB डेटा मिळतो. तर 2,399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 730GB डेटा मिळतो. म्हणजेच 2 रुपये अधिक खर्च करुन 365GB अॅडिशनल डेटा मिळतो.

  Smartphoneखरेदी करताना भारतीय सर्वात आधी पाहतात ही गोष्ट,नव्या रिसर्चमधून खुलासा

  2399 रुपये Jio प्लॅन - Reliance Jio चा 2399 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला 2GB दिवसाला हाय स्पीड डेटा मिळतो. FUP लिमिटनंतर युजर्स 64 kbps वर इंटरनेट अॅक्सेस करू शकतो. यात दररोज डेटाची अधिकाधिक लिमिट 2GB आहे, जो 365 दिवसांपर्यंत वॅलिड आहे. म्हणजे प्लॅनमध्ये वर्षभरात एकूण 730GB डेटा मिळतो. तसंच दिवसाला 100 SMS आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉल मिळतात. उपलब्ध एकूण डेटा 365 दिवसांच्या वॅलिडिटीसह 730 GB आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला Jio Apps चं मोफत सब्सक्रिप्शन मिळतं.

  2017 नंतर पहिल्यांदाच महागणार Amazon Prime Membership, इतकी वाढणार किंमत

  2397 रुपये Jio Plan - 2397 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला एकूण 365GB हाय स्पीड डेटा मिळतो. FUP लिमिटनंतर युजर्स 64 kbps वर इंटरनेट अॅक्सेस करू शकतात. दररोज 100 SMS आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा मिळते. प्लॅनची वॅलिडिटी 365 दिवस आहे. यात डेली डेटासाठी कोणतंही लिमिट नाही. युजर्स विना लिमिट डेटाचा वापर करू शकतात. म्हणजेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह, अनलिमिटेड डेटाची सुविधा दिली जाते.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Reliance Jio, Reliance Jio Internet

  पुढील बातम्या