• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • JioPhone Next या दिवशी होणार लॉन्च, 'रिचार्ज' पेक्षाही कमी पैसे द्यावे लागणार!

JioPhone Next या दिवशी होणार लॉन्च, 'रिचार्ज' पेक्षाही कमी पैसे द्यावे लागणार!

काही महिन्यांपूर्वी रिलायन्स जिओनं (Reliance Jio) रास्त दरात स्मार्टफोन (Smartphone) बाजारात आणण्याबाबत घोषणा केली होती. जिओफोन नेक्स्ट (Jiophone Next) बाजारात आल्यानंतर त्याच्या विक्रीसाठी जिओनं एक विशेष प्रणाली तयार केली आहे.

  • Share this:
मुंबई, 4 सप्टेंबर : रिलायन्स जिओ (Reliance Jio) ही देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. रिलायन्सने जिओच्या माध्यमातून टेलिकॉम मार्केटमध्ये आपलं स्थान अल्पावधीतच भक्कम केलं आहे. जिओने प्रीपेड आणि पोस्टपेड सिम कार्डसाठी आतापर्यंत वैविध्यपूर्ण ऑफर्स सादर केल्या आहेत. त्यामुळे जिओच्या ग्राहक संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी रिलायन्स जिओनं रास्त दरात स्मार्टफोन (Smartphone) बाजारात आणण्याबाबत घोषणा केली होती. त्यामुळे ग्राहक सध्या जिओच्या या नाविन्यपूर्ण स्मार्टफोनच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, ग्राहकांची प्रतीक्षा लवकरच संपणार असून हा फोन 10 सप्टेंबरला बाजारात आणण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. जिओफोन नेक्स्ट (Jiophone Next) बाजारात आल्यानंतर त्याच्या विक्रीसाठी जिओनं एक विशेष प्रणाली तयार केली आहे. गुगल बेस्ड (Google Based) जिओफोन नेक्स्ट अगदी काही दिवसांतच बाजारात दाखल होत आहे. जिओफोन नेक्स्ट हा बाजारात सध्या उपलब्ध असणाऱ्या विविध कंपन्यांच्या स्मार्टफोनच्या तुलनेत अधिक किफायतशीर असेल. जिओनेक्स्ट फोन खरेदीसाठी कंपनीनं एक विशिष्ट सेल्स स्ट्रक्चर (Sales Structure) तयार केलं असून, त्यानुसार कंपनीकडून ग्राहकांना वेगवेगळे पर्याय उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. त्यापैकीच एका पर्यायनुसार कंपनी जिओनेक्स्ट फोनची विक्री केवळ 500 रुपयांत करणार आहे. कंपनी जिओफोन नेक्स्टची विक्री ईझी सेल्स मॉडेलच्या माध्यमातून करणार आहे. येथे ग्राहकांना नेहमीचा वन टाईम पेमेंटचा (One Time Payment) पर्याय उपलब्ध असेल. परंतु, जास्तीत जास्त ग्राहकांनी हा फोन खरेदी करावा, अशी जिओची भूमिका आहे. त्यामुळे ग्राहकांना खरेदीवेळी सुरुवातीला संपूर्ण पैसे देण्याची गरज राहणार नाही. एका अहवालानुसार, कंपनीने या फोनच्या खरेदीकरिता ग्राहकांसाठी दोन जिओफोन नेक्स्ट मॉडेल आणली आहेत. यात बेसिक जिओफोन नेक्स्टची किंमत 5000 रुपये तर जिओफोन नेक्स्ट अॅडव्हान्सची किंमत 7000 रुपये असेल. यापैकी कोणताही फोन खरेदी करताना ग्राहकाला फोनची पूर्ण किंमत अदा करण्याची गरज नाही. याचाच अर्थ ग्राहकाला यापैकी कोणताही फोन खरेदी करतेवेळी फोनच्या किमतीच्या 10 टक्के म्हणजेच 500 रुपये किंवा 700 रुपयेच सुरुवातीला द्यावे लागतील. त्यानंतर फोनसाठीची उर्वरित रक्कम ग्राहकांना बॅंक किंवा लेंडिंग पार्टनरला द्यावी लागेल. म्हणजेच हा फोन ग्राहकाला हप्त्यावर घ्यावा लागणार हे स्पष्टच आहे. रिलायन्स जिओनं यासाठी नॉन बॅंकिंग फायनान्स कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. NBFCs असं या भागीदारीचं नाव आहे. त्यामुळे ग्राहकाला हा फोन खरेदी करतेवेळी थोडी जास्त रक्कम द्यावी लागणार आहे. म्हणजेच 5000 रुपयांचा फोन खरेदी केल्यास त्यावर ईएमआय लागू होणार असून, त्याची किंमत आणखी वाढणार आहे. परंतु, ही किंमत नेमकी किती असेल, आणि फोनची प्रत्यक्षात किंमत किती असेल,याबाबत कंपनीनं अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. ईटी नाऊ दिलेल्या वृत्तानुसार, जिओफोन नेक्स्टच्या विक्री अनेक पेमेंट मोडवरून (Payment Mode) करता यावी, यासाठी रिलायन्स जिओ अनेक भारतीय बॅंका आणि कर्जपुरवठा करणाऱ्या संस्थांसोबत भागीदारी करणार आहे. ही कंपनी या फोनच्या विक्रीसाठी भारतीय स्टेट बॅंक, पिरामल कॅपिटल, आयडीएफसी फर्स्ट अश्योर आणि डीएमआय फायनान्स यांचे सहकार्य घेऊ शकते. पुढील 6 महिन्यांत 50 दशलक्ष युनिट विक्रीतून 10,000 कोटी रुपयांच्या उलाढालीचे उदिदष्ट कंपनीने ठेवले आहे.
First published: