• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • जगातला सर्वात स्वस्त जिओ फोन नेक्स्ट कसा तयार झाला; पाहा JioPhone Next Making Video

जगातला सर्वात स्वस्त जिओ फोन नेक्स्ट कसा तयार झाला; पाहा JioPhone Next Making Video

Reliance Jio ने दिवाळीच्या आधी ‘Making of JioPhone Next’ फिल्म रिलीज केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : Reliance Jio ने दिवाळीच्या आधी ‘Making of JioPhone Next’ फिल्म रिलीज केली आहे. JioPhone Next सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन असून फोनला जबरदस्त फीचर्सही देण्यात आले आहेत. Jio ने लाँच केलेल्या व्हिडीओमध्ये JioPhone Next त्यांच्या इतर सेवांप्रमाणे मेड इन इंडिया, मेड फॉर इंडिया आणि मेड बाय इंडियन्स असल्याचं म्हटलं आहे. प्रत्येक भारतीयाला समान संधी आणि डिजीटल तंत्रज्ञानाचा समान वापर करता यावा हे या फोनचं खास उद्दिष्ट आहे. Jio आणि Google या दोघांनी मिळून JioPhone Next विकसित केला आहे. JioPhone Next Android OS वर चालेल. फोनला क्वॉलकॉम प्रोसेसर असेल अशी माहिती आहे. तसचं युजर्सला फोन योग्यरित्या ऑपरेट करता यावा यासाठी व्हॉईस असिस्टेंट फीचरही फोनला देण्यात आलं आहे. त्यामुळे युजर्स कोणत्याही भाषेत हवी ती माहिती मिळवू शकतील. त्याशिवाय युजर्सला खास ट्रान्सलेशनचीही सुविधा देण्यात आहे. फोनला जबरदस्त कॅमेराही देण्यात आल्याची माहिती आहे. कॅमेराला विविध फोटोग्राफी मोड्स, पोट्रेट मोड, नाइट मोड आणि इतरही कॅमेरासाठीचे खास फीचर्स देण्यात आले आहेत. दरम्यान, जिओफोन नेक्स्टच्या किमतीबाबत कंपनीनं अगोदरच स्पष्टीकरण दिलेलं आहे की, तो सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन असेल. या स्मार्टफोनची किंमत पाच हजार रुपयांपेक्षा कमी असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कंपनीनं अधिकृत माहिती सांगितलेली नाही.

  खूशखबर! Jio दिवाळीआधी ग्राहकांना देणार मोठं गिफ्ट; लाँच होणार जगातील सर्वात स्वस्त Smartphone

  दिवाळीच्या दिवशी हा स्मार्टफोन लाँच केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4 नोव्हेंबर 2021 ला जिओ आपला हा स्मार्टफोन लाँच करण्याबरोबरच त्याची किंमत (Jio Phone Next Price) आणि उपलब्धतेबद्दल माहिती जाहीर करणार आहे.
  Published by:Karishma
  First published: