Home /News /technology /

JioPhone Next मध्ये Qualcomm Chip सह मिळतील जबरदस्त फीचर्स, पाहा काय असेल किंमत

JioPhone Next मध्ये Qualcomm Chip सह मिळतील जबरदस्त फीचर्स, पाहा काय असेल किंमत

Jiophone Next मध्ये Qualcomm Processor वापर करण्यात आला असल्याची माहिती Reliance Jio ने दिली आहे.

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : देशातली टेलिकॉम सेवा पुरवणारी आघाडीची कंपनी असलेल्या Reliance Jio ने 'मेकिंग ऑफ जिओफोन नेक्स्ट' (Making of Jiophone Next) ही फिल्म रिलीज केली आहे. हा मेड इन इंडिया स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वी पडद्यामागे काय काय घडलं, याचं थोडक्यात दर्शन या छोट्या व्हिडीओतून घडवण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये Jio ने Android वर आधारित असलेल्या आपल्या प्रगती ऑपरेटिंग सिस्टीमवर (Pragati Operating System) प्रकाश टाकला आहे. प्रत्येक भारतीयाला तंत्रज्ञानाची समान संधी आणि समान उपलब्धता करून देण्यासाठी जिओफोन नेक्स्ट कटिबद्ध आहे, असं सांगण्यात आलं आहे. Jiophone Next मध्ये Qualcomm Processor वापर करण्यात आला असल्याची माहिती Reliance Jio ने दिली आहे. जिओने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, ऑप्टिमाइज्ड कनेक्टिव्हिटी (Optimized Connectivity) आणि लोकेशन टेक्नॉलॉजी यांसह डिव्हाइस परफॉर्मन्स, ऑडिओ आणि बॅटरी यांमध्ये ऑप्टिमायझेशन देण्यावर Jiophone Next मध्ये भर देण्यात आला आहे. Jiophone Next च्या समृद्ध फीचर्समुळे तंत्रज्ञान पूर्णतः नव्या पद्धतीने उपलब्ध होईल, असा विश्वास Reliance Jio ने व्यक्त केला आहे. Jiophone Next हा जगातला सर्वांत स्वस्त स्मार्टफोन लवकरच बाजारात लाँच होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कंपनीने त्या फोनसंदर्भात माहिती देणारा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. त्या फोनमधल्या काही फीचर्सबद्दल त्या व्हिडीओत सांगण्यात आलं आहे. voice assistant, a Read Aloud feature, a Translate feature, an Easy and Smart camera असे विविध फीचर्स फोनमध्ये असतील. Jiophone Next मध्ये युजर्सना ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर अपडेट्स पुरवले जाणार असून, त्याद्वारे वेळोवेळी सिक्युरिटी अपडेट्सही (Security Updates) मिळणार आहेत.

Jio दिवाळीआधी देणार मोठं गिफ्ट; लाँच होणार जगातील सर्वात स्वस्त Smartphone

हा मेड इन इंडिया, मेड फॉर इंडिया आणि मेड बाय इंडियन्स अर्थात भारतीयांनी भारतीयांसाठी भारतात बनवलेला फोन आहे, असं कंपनीने म्हटलं आहे. नव्याने विकसित करण्यात आलेली प्रगती ऑपरेटिंग सिस्टीम (Android-based Pragati OS) आणि क्वालकॉम प्रोसेसर यांच्यामुळे या फोनला उत्तम बॅटरी लाइफ असेल, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.

जगातला सर्वात स्वस्त जिओ फोन नेक्स्ट कसा तयार झाला; पाहा JioPhone Next Making Video

Jiophone Next विकसित करण्यासाठी रिलायन्स जिओने Google शी भागीदारी केली आहे. या वर्षी जून महिन्यात झालेल्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीने या फोनची घोषणा केली होती. मर्यादित युजर्सच्या साहाय्याने या फोनच्या चाचण्या सुरू झाल्या असून, दिवाळीच्या दरम्यान हा फोन ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं रिलायन्स जिओ आणि गुगल या कंपन्यांनी सप्टेंबरमध्ये संयुक्त प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं. जिओफोन नेक्स्ट हा मुकेश अंबानी यांच्या Reliance Jio कंपनीचा पहिला स्मार्टफोन असेल.
First published:

Tags: Reliance Jio, Smartphone

पुढील बातम्या