Home /News /technology /

केवळ 500 रुपये भरुन खरेदी करता येईल JioPhone Next, जाणून घ्या डिटेल्स

केवळ 500 रुपये भरुन खरेदी करता येईल JioPhone Next, जाणून घ्या डिटेल्स

JioPhone Next च्या लाँचआधी रिलायन्स अनेक बाबींवर काम करत आहे. त्यापैकी एक म्हणजे स्वस्तात फोन खरेदीची संधी, केवळ 10 टक्के रक्कम भरुन ग्राहकांना फोन घेता येईल.

  नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपला नवा स्मार्टफोन JioPhone Next 10 सप्टेंबरला लाँच करणार आहे. जिओफोन नेक्स्ट दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध होण्याची माहिती आहे. बेसिक वेरिएंट आणि एक अॅडव्हान्स वेरिएंट ज्याची किंमत 10000 रुपयांहून कमी आहे. JioPhone Next च्या लाँचआधी रिलायन्स अनेक बाबींवर काम करत आहे. त्यापैकी एक म्हणजे स्वस्तात फोन खरेदीची संधी, केवळ 10 टक्के रक्कम भरुन ग्राहकांना फोन घेता येईल. एका रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओने लाँचआधी जिओफोन नेक्स्टच्या सेल्स फायनेंसिगसाठी पाच बँकांसह करार केला आहे. पुढील सहा महिन्यात 5 कोटी JioPhone Next यूनिट्स् विक्री करण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. JioPhone Next खरेदी करताना, केवळ 10 टक्के डाउन पेमेंट करावं लागेल, अशी माहिती आहे. रिलायन्सने अद्याप फोनच्या किमतीचा आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केलेला नाही. परंतु हा जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असण्याचा दावा कंपनीने केला आहे. सध्या सर्वात स्वत 4G स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी M01 आहे. या फोनची किंमत 4999 रुपये आहे. म्हणजेच आता येणाऱ्या जिओ स्मार्टफोनची किंमत 5000 हून कमी असण्याची शक्यता आहे.

  नेटवर्क नसतानाही करता येणार कॉल, मेसेज; iPhone 13 मध्ये येणार जबरदस्त टेक्नोलॉजी

  काय असतील JioPhone Next चे स्पेसिफिकेशन्स - टिपस्टरने जिओफोन नेक्स्टच्या महत्त्वाच्या फीचर्सबाबत खुलासा केला आहे. लीकनुसार, जिओफोन नेक्स्टमध्ये 5.5 इंची एचडी डिस्प्ले आणि 4G volte डुअल सिम सपोर्ट असेल. तसंच 2500mAh बॅटरी, 4G कनेक्टिविटी, Android चं खास वर्जन, गुगल असिस्टेंट, Text to speech फीचर, स्मार्ट कॅमेरा असे फीचर्स असण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फोन 4GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेजसह Unisoc SoC द्वारा कार्य करेल. परंतु कंपनीकडून याबाबत अधिकृत खुलासा करण्यात आला नाही.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Reliance Jio, Smartphone

  पुढील बातम्या