धमाकेदार ऑफर! फक्त 141 रुपयांत JioPhone 2 घेऊन जा घरी, जाणून घ्या अटी

धमाकेदार ऑफर! फक्त 141 रुपयांत JioPhone 2 घेऊन जा घरी, जाणून घ्या अटी

जिओ फोन 2 च्या खरेदीबाबत अधिकृत वेबसाईट jio.com वर EMI ची ऑफर दिली जात आहे.

  • Share this:

मुंबई, 27 नोव्हेंबर : रिलायन्सच्या JioPhone2 चा सेल सध्या होत आहे. या फोनची खरेदी करण्याची संधी आहे. जिओ फोन 2 च्या खरेदीबाबत अधिकृत वेबसाईट jio.com वर EMI ची ऑफर दिली जात आहे. या फोनची किंमत 2 हजार 999 रुपये इतकी आहे. मात्र EMI ने हा फोन फक्त 141 रुपयांत घरी घेऊन जाता येईल.जिओ फोन 2 लोकप्रिय JioPhone चे पुढचे व्हर्जन आहे. 2017 मध्ये जिओफोन लाँच करण्यात आला होता.

JioPhone2 मध्ये फुल किबोर्डसह हॉरिझंटल स्क्रिन डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये फुल क्वार्टी किपॅड आहे. यामुळे टायपिंग सहज करता येते. या फोनमध्ये 2.4 इंचाचा डिस्प्ले आणि 512 एमबी रॅम आहे. याशिवाय 4 जीबी इंटरनल स्टोरेज असून 128 जीबी पर्यंत मेमरी वाढवता येते.

स्वस्त फोनच्या तुलनेत याचा कॅमेराही चांगला आहे. प्रायमरी कॅमेरा 2 मेगापिक्सल आहे. सेल्फीसाठी युजर्सना फ्रंट साइडला VGA कॅमेरा दिला आहे. याशिवाय Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि FM सुद्धा आहे. या फोनची बॅटरी 2,000mAh इतकी आहे. हा फोन KAI ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो.

जिओच्या या फोनमध्ये भारतातील 24 भारतीय भाषा चालतात. तसंच व्हॉइस कमांडलाही सपोर्ट करतो. याशिवाय व्हॉटसअॅप आणि युट्यूब ही अॅप्ससुद्धा आहेत.

First published: November 27, 2019, 9:34 PM IST
Tags: JIO

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading