Home /News /technology /

आता WhatsApp वरुन मागवता येणार किराणा सामान, Reliance JioMart घरोघरी सुविधा देण्यास सज्ज

आता WhatsApp वरुन मागवता येणार किराणा सामान, Reliance JioMart घरोघरी सुविधा देण्यास सज्ज

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील Reliance Retail ने आता WhatsApp वर ग्रॉसरी ऑर्डर घेण्यास सुरुवात केली आहे.

  नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील Reliance Retail ने आता WhatsApp वर ग्रॉसरी ऑर्डर घेण्यास सुरुवात केली आहे. भारतीय रिटेल सेक्टरमध्ये हा मोठा बदल आहे. रिलायन्सने Amazon, Flipkart, Big Basket सारख्या कंपन्यांना मोठी टक्कर दिली आहे. सध्या कंपनी ही सुविधा Invitation द्वारे देत आहे. ब्लूमबर्ग रिपोर्टनुसार, रिलायन्सने आता ही सुविधा देण्यास सुरुवात केली आहे, ज्यात WhatsApp मध्ये Tap and Chat बटणाद्वारे JioMart पर्यंत पोहोचता येईल. Reliance Retail च्या या सुविधेमुळे Amazon आणि Walmart च्या स्वामित्ववाली कंपनी Flipkart ला तगडी टक्कर मिळाली आहे. रिपोर्टनुसार, WhatsApp द्वारे शॉपिंग इन्विटेशन मिळालेल्या ग्राहकांनी सांगितलं, की या ऑर्डरमध्ये कमीत-कमी ऑर्डरची कोणतीही अट नाही. या ग्राहकांना इन्विटेशनसह 90 सेकंदाचं ट्यूटोरियल आणि कॅटलॉग मिळाला आहे.

  जगभरातील दिग्गज कंपन्यांमधील भारतीय 'Big Boss', Parag Agrawal सह टॉप भारतीय CEO

  WhatsApp ऑर्डरद्वारे काय-काय मिळणार - या लिंकद्वारे ग्राहक फळं, भाज्या, टूथपेस्ट, धान्य, कुकिंगसाठीचं इतर सामान ऑर्डर करू शकतात. ग्राहक जिओमार्टमधून ऑनलाइन किंवा ऑर्डर घरी पोहोचल्यानंतर कॅश पेमेंट करू शकतात.

  चुकून Delete झाले महत्त्वाचे WhatsApp Chats? परत मिळवण्यासाठी पाहा सोपा पर्याय

  Meta प्लॅटफॉर्मने (आधीचं Facebook) रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म यूनिटमध्ये जवळपास 6 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. त्याच्या 19 महिन्यांनंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. यामुळे जिओला सर्वाधिक फायदा होणार असून JioMart च्या सेलमध्ये मोठी वाढ होऊ शकते. WhatsApp चे देशात जवळपास 53 कोटी युजर्स आहेत. त्यापैकी Jio चे 42.5 कोटीहून अधिक ग्राहक आहेत.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Reliance, Reliance Jio, WhatsApp user

  पुढील बातम्या