Home /News /technology /

Jio टक्कर देण्यासाठी Vodafoneचा नवीन प्लान! 99 रिचार्जवर मिळवा बंपर ऑफर

Jio टक्कर देण्यासाठी Vodafoneचा नवीन प्लान! 99 रिचार्जवर मिळवा बंपर ऑफर

वोडाफोन-आयडिया कंपनीने ग्राहकांसाठी 99 आणि 555 रुपयांचे दोन नवीन प्लान लाँच केले आहेत.

    मुंबई, 16 जानेवारी: Jio, Airtelचा प्रतिस्पर्धी असलेल्या Vodafone-Idea कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्ता मस्त नवी ऑफर आणली आहे. कंपनीकडून आता 99 रुपयांपासून 600 रुपयांपर्यंत बंपर ऑफर Prepaid धारक असणाऱ्या ग्राहकांना देण्यात येणार आहेत. ग्राहकांना अवघ्या 99 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेटची सुविधा कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. Jio लाँच झाल्यानंतर कॉलिंग, इंटरनेटचे दर कमी झाले. जिओनंतर इतर सर्वच कंपन्यांनी नेटचे दर कमी केले. आता सर्वच कंपन्यांच्या दरात वाढ झाली आहे. दरम्यान, यातही कंपन्यांनी ग्राहकांसाठी काही खास प्लॅन आणले आहेत. व्होडाफोन आयडियाने ग्राहकांना दोन नव्या ऑफर्सचा SMS द्वारे अलर्ट पाठवला आहे. त्यातली एक ऑफर 99 आणि दुसरा 555 रुपयांचा प्लान असणार आहे. (Vodafone 99 Prepaid Plan) Vodafone 99 Prepaid Plan शंभर रुपयांपेक्षा कमी असलेला हा प्लान ग्राहकांसाठी खास वोडाफोन-आयडिया कंपनीकडून देण्यात आला आहे. यामध्ये 18 दिवसांची व्हॅलिडिटी असणार आहे. 18 दिवसांसाठी तुम्हाला 1 GB डेटा, रोज 100 SMS आणि अनलिमिडेट कॉलिंग फ्री मिळणार आहे. वोडाफोन प्लेसाठी कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन सोबत 999 रुपयांमध्ये ZEE 5 अॅपसाठी सब्सक्रिप्शन मिळणार आहे. Vodafone Rs.555 Plan- या प्लानमध्ये ग्राहकांना 70 दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लानमध्ये 1.5 GB डेटा, अनलिमिडेट कॉलिंग आणि 100 SMS दर दिवशी फ्री मिळणार आहेत. वोडाफोन प्लेसाठी कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन आणि ZEE 5 अॅपसाठी सब्सक्रिप्शनही उपलब्ध आहे. हेही वाचा-TikTokने Facebookला मागे टाकलं, एका महिन्याची कमाई वाचून थक्क व्हाल Vodafone आणि jio च्या 555 प्लानमध्ये काय नेमकं काय बेस्ट आहे. जिओच्या 555 प्लानमध्ये तुम्हाला 90 रुपयांची प्राइम मेंबरशिप घेणं बंधनकारक आहे. यासोबत जिओमध्ये 1.5 GB डेटा, jio ते jio अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS फ्री सेवा मिळते मात्र जिओ ते इतर नेटवर्कसाठी फक्त 3000 मिनिटं मिळतात. तेच vodafoneच्या 555 प्लानमध्ये तुम्हाला सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉल, 100 SMS, दीड GB डेटा फ्री मिळतो 70 दिवसांसाठी. त्यामुळे जास्त फोनचा वापर असेल तर वोडाफोन कॉलिंगच्या सेवेसाठी बेस्ट प्लान देतं. याशिवाय Vodafone-idea कंपनीने नुकताच 449 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. 56 दिवसांच्या व्हॅलिडिटीच्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2 जीबी डेटा दिला जात आहे. या प्लॅनमध्ये देशभरात कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉल आणि दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत. हेही वाचा-तुमच्या खिशातून आता जास्त कर जाणार? कर रचनेत होऊ शकतात मोठे बदल
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Money, Techonology, Vodafone, Vodafone 4G, Vodafone idea tariff plan

    पुढील बातम्या