रिचार्जच्या किंमती वाढल्यानंतर युजर्स जास्त मुदतीचे प्लॅन निवडण्याऐवजी स्वस्तातल्या प्लॅनला पसंती देत आहेत. याआधई 299 रुपयांमध्ये 70 दिवसांची मुदत मिळत होती. पण आता त्यापेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत. .व्होडफान-आयडियाने 379 रुपये, जिओने 329 रुपयांत 84 दिवसांचा प्लॅन दिला आहे. तर एअरटेलने 56 दिवसांसाठी 399 रुपयांचा प्लॅन दिला आहे.
Vodafone-Idea
व्होडाफोन आयडियाने 379 रुपयांचा रिचार्ज दिला असून यामध्ये 84 दिवसांची मुदत मिळणार आहे. यात 6 जीबी डेटा आणि 1000 एसएमस मिळतील. व्होडाफोनसह इतर नेटवर्कवर फ्री कॉलिंग मिळणार आहे. तसेच व्होडाफोन प्ले अॅप आणि झी5 चे फ्री सबस्क्रीप्शन मिळणार आहे.
Reliance Jio
जिओने हाच प्लॅन 329 रुपयांत दिला आहे. यामध्ये जिओ टू जिओ फ्री कॉलिंग मिळणार आहे. इतर नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी 3 हजार नॉन जिओ मिनिटे मिळतील. तसेच व्होडाफोनप्रमाणे 6 जीबी इंटरनेट आणि 1000 एसएमएस मिळतील. हा प्लॅन 84 दिवसांसाठी असणार आहे.
Airtel
एअरटेलनं व्होडफोन आणि जिओपेक्षा कमी मुदतीचा प्लॅन लाँच केला आहे. पण यामध्ये फायदे जास्त दिले आहेत. 56 दिवसांच्या या प्लॅनवर दररोज दीडजीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळणार आहेत. याशिवाय इतर नेटवर्कवरसुद्धा फ्री कॉलिंग करता येणार आहे. एवढंच नाही तर एअरटेल Xtream अॅप, विंक म्युझिकचे फ्री सबस्क्रीप्शन मिळणार आहे.
मोबाईल चोरी झाला असेल तर 'इथं' शोधा, सरकारनेच उचललं पाऊल मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.