News18 Lokmat

Jio युजर्ससाठी खूशखबर, ग्राहकांना मिळणार 5 वर्षांपर्यंत 'ही' सेवा मोफत

रिलायन्स जिओनं आपल्या ग्राहकांचं मनोरंजन करण्यासाठी एक नवा करार केला आहे. यामध्ये तुम्हाला एक रुपया न भरता या सेवेचा आनंद घेता येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 3, 2019 01:39 PM IST

Jio युजर्ससाठी खूशखबर, ग्राहकांना मिळणार 5 वर्षांपर्यंत 'ही' सेवा मोफत

मुंबई, 03 जानेवारी : जिओ कंपनीने टेलिकॉममध्ये प्रवेश करताच अनेक मोबईल कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली. डिजिटल इंडिया प्रकल्पासाठी जिओचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. जिओमुळे भारतातील मोबाईल युजर्सना स्मार्ट होण्यासाठी मदत झाली. सुरुवातीच्या काळात मोफत सेवा दिल्यामुळे भारतातील अनेक गरीब मोबाईल युजर्सना इंटरनेटविषयी माहिती मिळाली. त्यानंतर जिओनं सर्वसामान्यांना परवडतील असं रिचार्ज उपलब्ध करून दिलं. रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक सुविधा आणली आहे.

जगातील सगळ्यात मोठं मोबाईल नेटवर्क जिओने ब्रॉडकास्टर स्टार इंडियाच्या प्रमुखांसोबत भागीदारी केल्याची घोषणा केली आहे. जिओनं केलेली ही भागीदारी पाच वर्षांसाठी असून यामुळे स्पोर्टस क्षेत्रातील युजर्ससाठी एक नवी सुरुवात होणार आहे. Star टेलिव्हिजनवर दिसणाऱ्या सर्व मॅच जिओ टीव्हीवर उपलब्ध करणार असल्याची घोषणा या करारात करण्यात आली आहे.

रिलायन्स जिओनं टेलिव्हिजनचा आनंद ग्राहकांना मोबाईलवर घेता यावा यासाठी Jio TV अस्तित्वात आणलं. जिओ टीव्हीच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करण्याचं काम रिलायन्सने केलं आहे. आता क्रिकेट प्रेमींसाठी जिओनं एक नवा करार केला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसोबत एक भागीदारीचा करार केला आहे. या भागीदारीमध्ये T-20, वन-डे इंटरनॅशनल, इंटरनॅशनल टेस्ट क्रिकेट आणि BCCIच्या महत्त्वाच्या सामन्यांचं प्रक्षेपण जिओमार्फत करणार आहे.

भारतीय जिओ युजरला दमदार कनेक्टिव्हिटीसोबतच क्रिकेटविषयीची माहिती मिळावी यासाठी लाईव्ह स्ट्रिमिंग आणि हाय स्पीड डेटा नेटवर्कचा पाच वर्षांचा करार केला आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना आता आपल्या मोबाईलवर मॅचचा आनंद घेता येणार आहे. जिओनं केलेल्या या करारामध्ये फक्त भारताच्या सर्व मॅचेस आपल्या मोबाईल फोनवर पाहता येणार आहेत.

Loading...

VIDEO: लाडक्या आचरेकर सरांना अखेरचा निरोप देताना सचिनला अश्रू अनावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 3, 2019 01:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...