Home /News /technology /

Jio ग्राहकांना थायलंडला जाण्याची संधी, फक्त 10 सेकंदाचा VIDEO करा आणि परदेशात फिरा

Jio ग्राहकांना थायलंडला जाण्याची संधी, फक्त 10 सेकंदाचा VIDEO करा आणि परदेशात फिरा

Jio ने ग्राहकांसाठी थेट थायलंड ट्रिपला जाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

    मुंबई, 02 फेब्रुवारी : रिलायन्स जिओ ग्राहकांना अनेक ऑफर देत असते. आता कंपनीने ग्राहकांसाठी थेट थायलंड ट्रिपला जाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी ग्राहकांना क्रिएटिव्ह चॅलेंज पूर्ण करावं लागेल. कंपनीने स्नॅपचॅटसोबत एक चॅलेंज सुरू केलं आहे. यामध्ये विजेत्याला थायलंड ट्रिपवर जाण्यासाठी दोन तिकिटे दिली जाणार आहेत. जिओने Jio's Got Talent नावाने चॅलेंज सुरू केलं आहे. यासाठी कंपनीने सोशल मीडियावर स्नॅपचॅटसोबत पार्टनरशिप केली आहे. जिओच्या ग्राहकांना स्नॅपचॅटच्या 10 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये टॅलेंट दाखवायचं आहे. चॅलेंज असं आहे की, 10 सेकंदाच्या व्हिडिओत क्रिएटिव्ह, गंमत आणि एक्सप्रेसिव्ह पद्धतीने मित्र आणि कुटुंबीयांशी जोडलं जाईल. युजर्सना व्हिडिओ तयार करण्यासाठी जिओ आणि स्नॅपचॅटने एक स्नॅपचॅट लेन्स तयार केली आहे. यामध्ये युजर्सना वेगवेगळ्या प्रकारचे AR (Augmented Reality)प्रॉप्स मिळतील. स्नॅपचॅट लेन्सच्या माध्यमातून कमीत कमी 10 सेकंदाचा व्हिडिओ तयार करावा लागेल. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये युजर्सना स्नॅपचॅटचा स्नॅपकोड युजरनेम टाकावे लागेल. यानंतर या व्हिडिओला स्नॅपचॅटवर Our Story मध्ये जाऊन अपलोड करावं लागेल. Facebook वर दिसणाऱ्या अ‍ॅडमुळे हैराण आहात; झुकरबर्ग म्हणतोय, या स्टेप्स करा फॉलो ज्याचा कंटेंट क्रिएटिव्ह आणि एक्सप्रेसिव्ह असेल त्याला दोन लोकांना थायलंडला जाण्यासाठी तिकिट मिळेल. याशिवाय 100 बेस्ट एंट्रीसाठी एक महिन्यांचे जिओ रिचार्ज मिळेल. 4 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला 10 सेकंदाचा व्हिडिओ तयार करायचा आहे. आजपासून 'या' स्मार्टफोनमधील WhatsApp होणार बंद, यामध्ये तुमचा फोन तर नाही?
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: JIO

    पुढील बातम्या