Home /News /technology /

Jio ग्राहकांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत, लाँच करणार 4जी स्मार्टफोन?

Jio ग्राहकांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत, लाँच करणार 4जी स्मार्टफोन?

जिओने दोन 4 जी फीचर फोन याआधी लाँच केले आहेत. आता स्वस्तातला स्मार्टफोन लाँच केली जाण्याची शक्यता आहे.

    मुंबई, 04 मार्च : टेलिकम्युनिकेशन कंपन्यांमध्ये जिओने अल्पावधीत ग्राहकांना आपल्याकडं खेचलं आहे. सर्वात स्वस्त इंटरनेट दिल्यानंतर स्वस्तातला जिओ फोनही ग्राहकांसाठी दिला. दीड हजार रुपयांत जिओने 4जी फीचर फोन लाँच केला. त्यानंतर आता आणखी एक मोठं पाऊल जिओ टाकण्याची शक्यता आहे. जिओ स्वस्तातला 4 जी फोन लाँच करु शकते. स्वस्तातल्या या 4जी फोनची किंमत 2 ते 3 हजार रुपये इतकी असण्याची शक्यता असते. काही मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार रिलायन्स जिओ स्वस्तातला स्मार्टफोन लाँच करणार असल्याचं म्हटलं आहे. हा 4 जी फोन 2 ते 3 हजार रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध होऊ शकतो. या स्वस्त स्मार्टफोनसाठी काही कंपन्यांसोबत Jio देणार मोठं गिफ्ट, लाँच करणार 4जी स्मार्टफोन?जिओ काम करत आहे. मात्र याबाबत जिओकडून अद्याप काही सांगण्यात आलेलं नाही. देशातील सर्व 2जी युजर्सना 4जी सेवा मिळण्यासाठी जिओ पाऊल उचलण्याच्या तयारी करत आहे. यामध्ये भारतीय आणि कोरियन कंपन्यांकडून कमी किंमतीत 4 जी स्मार्टफोन लाँच करण्याची चर्चा सुरु आहे. स्वस्त स्मार्टफोन जिओच्या खास ऑफर्ससह विक्री करण्यात येईल असं म्हटलं जात आहे. हे वाचा : Jio ची बेस्ट ऑफर! 199 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळणार दुप्पट फायदा जिओने याआधी दोन 4जी फीचर फोन लाँच केले आहेत. यामध्ये जिओ फोन आणि जिओ फोन 2 यांचा समावेश आहे. याशिवाय जिओने LYF ब्रँडसह अनेक 4जी स्मार्टफोनही लाँच केले होते. हे वाचा : Jio, Vodafone-Idea, Airtel चे बेस्ट प्लॅन, दररोज 2 GB इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉल
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: JIO

    पुढील बातम्या