Jio ने बंद केली जुनी ऑफर, ग्राहकांना मिळणार नाही 'हा' फायदा

Jio ने बंद केली जुनी ऑफर, ग्राहकांना मिळणार नाही 'हा' फायदा

नवीन जिओ ग्राहकांना आता प्रीव्ह्यू ऑफरचा लाभ मिळणार नाही. याआधीच कंपनीने प्रीव्ह्यू ऑफर बंद करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं.

  • Share this:

मुंबई, 27 नोव्हेंबर : जिओ फायबर प्रीव्ह्यू ऑफर आता नव्या ग्राहकांना मिळणार नाही. ही ऑफर रिलायन्स जिओने त्यांच्या पहिल्या ग्राहकांसाठी सुरू केली होती. यामुळे हाय स्पीड ब्रॉडबँड सर्व्हिस मिळत होती. प्रीव्ह्यू ऑफर जिओ फायबर ब्रॉडबँड सर्व्हिसच्या लाँचिंगआधी देण्यात आली होती. यासाठी राउटरच्या आधारावर 4 हजार 500 किंवा 2 हजार 500 रुपये रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉजिट ठेवण्यात आलं होतं.

कंपनीने सप्टेंबर महिन्यात घोषणा केली होती की, प्रीव्ह्यू ऑफर वापरणाऱ्या सध्याच्या ग्राहकांना पेड प्लॅनमध्ये मायग्रेट केलं जाईल. अद्याप कंपनीकडून बऱ्याच ग्राहकांचे प्लॅन बदलणे बाकी आहे. नवीन ग्राहकांना मात्र प्रीव्ह्यू ऑफरचा लाभ घेता येणार नाही. नवे जिओ युजर्स 699 रुपयांत जिओ फायबर घेऊ शकतात. हा प्लॅन प्रीव्ह्यू ऑफर प्रमाणे नाही. प्रीव्ह्यू ऑफरमध्ये ग्राहकांना 2 हजार 500 रुपयांच्या वन टाइम सिक्युरीटी डिपॉजिटमध्ये इंटरनेट कनेक्टीव्हीटी दिली जात होती. जुलै 2017 मध्ये ही ऑफर सुरु केली होती.

नवीन जिओ ग्राहकांना आता प्रीव्ह्यू ऑफरचा लाभ मिळणार नाही. याआधीच कंपनीने प्रीव्ह्यू ऑफर बंद करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. आतापर्यंत कंपनीने जुन्या आणि नव्या अशा दोन्ही ग्राहकांना प्रीव्ह्यू ऑफर दिली होती.

प्रीव्ह्यू ऑफरमध्ये ग्राहकांना 1.1TB (FUP) डेटासह 100Mbps स्पीड मिळत होते. या ऑफरचे फायदे 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळत नाहीत. या प्लॅनशिवाय 849 रुपयांचा सिल्वर प्लॅन, 1299 रुपयांचा गोल्ड प्लॅन, 2499 रुपयांचा डायमंड प्लॅन, 3999 रुपयांचा प्लॅटिनम आणि 8499 रुपयांचा टायटेनियम असेही प्लॅन आहेत. यात प्लॅटिनम आणि टायटेनियम प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना जिओ फर्स्ट डे फर्स्ट शो मूव्ही सर्व्हिसेसचा फायदाही मिळतो.

Published by: Suraj Yadav
First published: November 28, 2019, 10:43 AM IST
Tags: JIO

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading