Jio Platformsमध्ये Qualcomm करणार 730 कोटींची गुंतवणूक

Jio Platformsमध्ये Qualcomm करणार 730 कोटींची गुंतवणूक

Jioमध्ये आत्तापर्यंत 1.18 लाख कोटींची गुंतवणूक आली आहे. Facebook, Silver Lake Partners, KKR आणि Vista Equity या दिग्गज कंपन्यांनी या आधी गुंतवणूक केली आहे.

  • Share this:

मुंबई 12 जुलै: गेल्या तीन महिन्यांपासून Jio Platformsमध्ये सुरू असलेला गुंतवणुकीचा ओघ अजुनही सुरूच आहे. Qualcomm Ventures ही कंपनी Jioमध्ये तब्बल 730 कोटींची गुंतवणूक करणार आहे. गेल्या 3 महिन्यांमधली ही 13वी गुंतवणूक असून या आधी जगातल्या अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी Jioमध्ये पैसे गुंतवले आहेत. जगभर आणि देशात आर्थिक मंदिचं वातावरण असताना अशी गुंतवणूक होणं हा विक्रम मानला जात आहे.

Jioमध्ये आत्तापर्यंत 1.18 लाख कोटींची गुंतवणूक आली आहे. Facebook, Silver Lake Partners, KKR आणि Vista Equity या दिग्गज कंपन्यांनी या आधी गुंतवणूक केली आहे.

दीर्घकाळासाठी Qualcommची गुंतवणू फायद्याची ठरेल. कंपनीच्या अनुबवाचा फायदा 5Gच्या विस्तारासाठी होईल असं मत रिलायन्सचे संचालक मुकेश अंबानी यांनी व्यक्त केलं आहे. तर Jioची 5G सेवा ही भारतीयांसाठी मोठं वरदान ठरणार असून त्यामुळे सर्वच क्षेत्रांचं स्वरूप बदलून जाणार असल्याचं मत Qualcomm च्या CEOनी व्यक्त केलं आहे. Jioने भारतात डिजिटल क्रांती केली असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

Lamborghini पहिली सुपर हायब्रिड कार लाँच, वेग 350 किमी प्रतितास आणि किंमत...

या गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांमधली सिल्वर लेक फर्म ही टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर नावाजलेली फर्म आहे. जगभरात सुमारे 43 अरब डॉलर्सची संपत्ती असून जवळपास जवळपास 100 गुंतवणूकी आणि ऑपरेटिंग व्यावसायिकांची टीम आहे. याआधी, सिल्व्हर लेकने अलिबाबा ग्रूप, एअरबीएनबी, डेल, दीदी चकिंग, हायला मोबाइल, अँट फायनान्शियल, एल्फाबेट व्हॅरिली आणि ट्विटरमध्येही गुंतवणूक केली आहे.

कोरोनाच्या संकटात भारतात Googleवर वेगळाच मुद्दा झाला सर्च, जूनमध्ये ट्रेंड बदलला

रिलायन्सच्या डिजिटल व्यवसायातील मोठा प्लॅटफॉर्म हा जिओचा आहे. रिलायंस जियो इन्फोकॉम लिमिटेड ही जिओ प्लॅफॉर्ममधील कंपनी आहे. याशिवाय माय जियो, जिओ टीव्ही, जियो सिनेमा, जिओ न्यूज आणि जिओ सावन. एवढेच नव्हे तर रिलायन्स या कंपनी अंतर्गत आपले शिक्षण, आरोग्य सेवा आणि कृषी डिजिटल सेवा देखील देते.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 12, 2020, 9:08 PM IST

ताज्या बातम्या