Jio Phone युजर्ससाठी खास अ‍ॅप लाँच; हजारोंची बक्षिसं जिंकण्याची संधी

Jio Phone युजर्ससाठी खास अ‍ॅप लाँच; हजारोंची बक्षिसं जिंकण्याची संधी

जीओ फोन युजर्सला क्रिकेटसंबंधी प्रत्येक छोट्या-मोठ्या लाईव्ह अपडेट देण्यासाठी, JioCricket अ‍ॅप सुरू करण्याचा प्रमुख उद्देश आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : रिलायन्स जीओने आपल्या Jio Phone युजर्ससाठी क्रिकेटसंबंधी एक खास अ‍ॅप लाँच केलं आहे. JioCricket असं या अ‍ॅपचं नाव आहे. या ऍपद्वारे युजर्सला लाईव्ह स्कोर, मॅच अपडेट्स आणि क्रिकेटसंबंधी बातम्या, व्हिडिओ पाहता येणार आहे. जीओ फोनमध्ये हे जीओक्रिकेट अ‍ॅप अनेक भारतीय भाषांना सपोर्ट करतं.

Jio Phone मध्ये JioCricket अ‍ॅपसाठी 9 भाषा उपलब्ध आहेत. बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, तमिळ, तेलुगू या भाषा देण्यात आल्या आहेत. Jio Cricket Play Along गेम या अ‍ॅपमध्ये देण्यात आलं आहे. हे हिंदी आणि इंग्रजीमध्ये असून, युजर्स Jio Store वरून डाउनलोड करू शकतील.

(वाचा - Reliance Jioची आणखी एक कमाल; स्वदेशी JioPages वेब ब्राउजर लाँच)

जीओ फोन युजर्सला क्रिकेटसंबंधी प्रत्येक छोट्या-मोठ्या लाईव्ह अपडेट देण्यासाठी, JioCricket अ‍ॅप सुरू करण्याचा प्रमुख उद्देश आहे. युजर्स लाईव्ह स्कोरसह हे अ‍ॅप विविध व्हिडिओ, आगामी प्लेअर फिक्स्चर पाहण्यासारखे पर्यायही लिस्ट करतो.

(वाचा - JIO च्या सब्सक्राइबर्समध्ये मोठी वाढ; एयरटेल, वोडाफोन-आयडियाला मोठं नुकसान)

JioCricket अ‍ॅपमध्ये 'Jio Cricket Play Along'

हे एक सेक्शन देण्यात आलं आहे, ज्यात युजर्स मॅच अपडेट्सचं पूर्वानुमान लावू शकतात. यात 50000 रुपयांपर्यंत रिलायन्स व्हाउचर्स जिंकण्याची संधीही युजर्सला मिळणार आहे. JioCricket अ‍ॅपच्या होमपेजवर हे गेम सेक्शनमध्ये देण्यात आलं आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: October 24, 2020, 9:03 AM IST
Tags:

ताज्या बातम्या