मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Jio IPL Tariff Plans: आयपीएलसाठी जिओचे खास प्लॅन्स, मोबाइलवर कुठेही पाहू शकाल सामने

Jio IPL Tariff Plans: आयपीएलसाठी जिओचे खास प्लॅन्स, मोबाइलवर कुठेही पाहू शकाल सामने

कोणत्याही अडथळ्याशिवाय आयपीएलचे सामने पाहता यावे याकरता जिओने काही नवीन टेरिफ प्लॅन (Jio IPL Tariff Plans) लाँच केले आहेत.

कोणत्याही अडथळ्याशिवाय आयपीएलचे सामने पाहता यावे याकरता जिओने काही नवीन टेरिफ प्लॅन (Jio IPL Tariff Plans) लाँच केले आहेत.

कोणत्याही अडथळ्याशिवाय आयपीएलचे सामने पाहता यावे याकरता जिओने काही नवीन टेरिफ प्लॅन (Jio IPL Tariff Plans) लाँच केले आहेत.

मुंबई, 16 सप्टेंबर : आयपीएलचा (IPL 2020) नवा हंगाम अवघ्या काही तासात सुरू होणार आहे. अशावेळी कोणत्याही अडथळ्याशिवाय आयपीएलचे सामने पाहता यावे याकरता जिओने काही नवीन टेरिफ प्लॅन (Jio IPL Tariff Plans) लाँच केले आहेत. आयपीएल-13 साठी असणारे हे एक्सक्लूझिव्ह प्लॅन्स आहेत. जिओने हे नवे प्लॅन्स 'जिओ क्रिकेट प्लॅन' (Jio Cricket Plan) अंतर्गत लाँच केले आहेत.

या प्लॅनमध्ये यामध्ये डेटा आणि व्हॉईस कॉलिंगसह एका वर्षाचे डिझ्नी प्लस हॉटस्टार (Disney + Hotstar)चं VIP सब्सक्रिप्शन मिळेल.  Disney + Hotstar अ‍ॅपद्वारे फ्री लाइव्ह ड्रीम 11 आयपीएल मॅच पाहता येतील. हॉटस्टारच्या या सब्सक्रिप्शनची किंमत 399 रुपये आहे. 'जिओ क्रिकेट प्लॅन' मध्ये 1 महिना ते 1 वर्ष वैधता असणारे प्रीपेड प्लॅन्स आहेत. वैधता कितीही असली तरी हॉटस्टारचे एका वर्षाचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

(हे वाचा-'शेतकऱ्यांची ओळख पटवणे राज्य सरकारचे काम', घोटाळ्याबाबत मोदी सरकारचे स्पष्टीकरण)

जिओ क्रिकेट प्लॅन 401 रुपयांपासून 2599 रुपयांपर्यंत आहेत. 28 दिवसांची वैधता असणाऱ्या 401 रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसाला 3 जीबी डेटा मिळेल. तर 598 रुपयांच्या प्लॅनमध्ये रोज 2 जीबी डेटा उपलब्ध असेल. त्याची वैधता 56 दिवसांची आहे. तर 84 दिवसांच्या प्लॅन्सची किंमत 777 रुपये असून यामध्ये रोज 1.5 जीबी डेटा मिळेल.  तर 2599 रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये रोज 2 जीबी डेटा मिळणार आहे.

(हे वाचा-SBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम 18 सप्टेंबरपासून बदलणार)

संपूर्ण सामना एकापेक्षा जास्त वेळा पाहण्यासाठी जिओ क्रिकेटच्या प्लॅनमध्ये अॅड-ऑन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. Rs 499 add-on Jio Cricket Plan अंतर्गत ग्राहकांना 56 दिवसांसाठी वैधता असणाऱ्या प्लॅनमध्ये प्रति दिन 1.5 जीबी डेटा मिळेल तर एका वर्षाचे डिझ्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन देखील मिळेल.

First published:
top videos